भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आज 58 वा वाढदिवस... खेळाडू, कॉमेंटेटर, संघ व्यवस्थापक आणि आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अशा सर्व भूमिकेत रवी शास्त्री दिसले. 27 मे 1962मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला. 21 फेब्रुवारी 1981मध्ये त्यांनी टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केले आणि 25 नोव्हेंबर 1981मध्ये वन डे संघात पदार्पण केले. 10 जानेवारी 1985मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजचे सर गॅरी सोबर्स यांचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा चेंडूंत सहा षटकार खेचण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. रवी शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय खेळाडूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं तर त्याना शूर असे संबोधले...
रवी शास्त्रींवर बॉलिवूड अभिनेत्रीचं होतं अफाट प्रेम; एका मस्करीनं तुटलं नातं?
सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा
शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा
रवी शास्त्री यांनी 80 कसोटीत 3830 धावा आणि 151 विकेट्स घेतल्या आहेत. 206 ही त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. 150 वन डे सामन्यांत त्यांनी 3108 धावा करताना 4 शतकं व 18 अर्धशतकं झळकावली आहेत. वन डे त 129 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत.