भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार (Team India Former Captain) विराट कोहलीनं (Virat Kohli) आता कॉफी व्यवसायात (Coffee Business) एन्ट्री घेतली आहे. त्यानं पॅकेज्ड कॉफी प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. विराटनं रेज कॉफी (Rage Coffee) या स्टार्टअपमध्ये हिस्सा खरेदी केलाय. यापूर्वी अनेक क्रिकेटर्स व्यवसायात उतरले आहेत.
रेज कॉफीने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती करण्याची घोषणाही केली आहे. दरम्यान, आता विराट या स्टार्टअपच्या उत्पादनाची जाहिरात करताना दिसणार आहे.
किती केली गुंतवणूक
रेज कॉफीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. कंपनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये उपस्थित आहे. विराट कोहलीनं स्टार्टअप कंपनीत किती स्टेक खरेदी केले आणि किती रक्कम गुंतवली याची माहिती उपलब्ध नाही. देशभरात आपली उपस्थिती अधिक वाढवण्याची त्यांची योजना असल्याचं बुधवारी यासंदर्भातील घोषणा करताना रेज कॉफीने सांगितलं.
कंपनी भांडवल विपणन आणि वितरणासाठी वापरणार असल्याचे रेज कॉफीने सांगितलं. यासह, उत्पादन वाढविण्यासाठी, नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आणि वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये अधिक चांगल्या लोकांना जोडण्यासाठी देखील याचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी, सिक्स्थ सेन्स व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील रेज कॉफीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५० लाख दशलक्ष भांडवल उभारले होते.
Web Title: virat kohli anushka sharma indian cricketer former captain virat kohli invests in startup business rage coffee check details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.