Virat Kohli Anushka Sharma Net Worth: 'विराट अनुष्का'(Virat Anushka Wedding Anniversary) म्हणजे सर्वांचे लाडके कपल. यांच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. चित्रपट कलाकार आणि चाहते त्यांच्या लाडक्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. विराट आणि अनुष्काच्या प्रेम कहाणीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे, हे चाहत्यांना कदाचित माहीत नसेल.
विराट कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर कसोटी सामन्यात पदार्पणासाठी त्याला 2011 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. विराटने पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. विराटच्या पदार्पणानंतर तब्बल चार महिन्यांनी अनुष्का शर्माचा पहिला चित्रपट आला होता. तिने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
कोणाकडे किती संपत्ती आहे?
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती सध्या 1050 कोटी रुपये आहे. विराट कोहलीला बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय वेगवेगळ्या फॉरमॅटचे सामने खेळूनही त्याची कमाई होते. इतकंच नाही तर दरवर्षी कोहली आयपीएलमधूनही भरपूर कमाई करतो. याशिवाय विराट अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती करतो. त्याचा स्वतःचा व्यवसायही आहे.
अनुष्काची एकूण संपत्ती किती?
विराटच्या संपत्तीसमोर अनुष्का शर्माची संपत्ती खूपच कमी आहे. सध्या अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटी रुपये आहे. 34 वर्षीय अनुष्का महिन्याला एक कोटी आणि वार्षिक 12 कोटींहून अधिक कमावते. अनुष्काच्या कमाईच्या साधनांबद्दल चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच चित्रपटांची निर्मिती आहे. याशिवाय ती अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधूनही पैसे कमावते.
Web Title: Virat Kohli Anushka Sharma Net Worth: Anushka Sharma or Virat Kohli, Who has the most wealth? Find out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.