मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) एक विनंती केली आहे. त्या विनंतीत त्याने परदेश दौऱ्यावर खेळाडू व साहाय्यक कर्मचाऱ्यांना आपापल्या पत्नीसोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. BCCIच्या नियमानुसार परदेश दौऱ्यातील खेळाडू व साहाय्यक कर्मचारी यांनी त्यांच्या पत्नीसोबत केवळ दोन आठवडे राहता येत होते. मात्र, कोहलीने संपूर्ण दौऱ्यात त्यांना सोबत राहण्याची विनंती केली आहे.
कोहलीने प्रथम बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही विनंती व्यक्त केली. त्याने ही विनंती प्रशासकीय समितीसमोर मांडली जाईल याचीही दक्षता घेतली. कोहलीने तशी विनंती केल्याच्या वृत्ताला प्रशासकीय समितीच्या सुत्रांनी दुजोरा दिला. मात्र, या नियमात तुर्तास तरी बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमणियम यांनीही लेखी स्वरूपात विनंती अर्ज दिला आहे.
Web Title: Virat Kohli asks BCCI to let him stay with the wife!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.