Virat Kohli Captaincy Missing, IND vs ENG 5th Test: भारतीय संघाने गेल्या वर्षी २-१ ने आघाडी घेतलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज इंग्लंडमध्ये संपन्न झाला. इंग्लंडच्याजो रूट ( Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांच्या शतकाच्या जोरावर त्यांनी ७ गडी राखून जिंकली आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले. पहिल्या डावानंतर मिळालेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडला दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बिनबाद १०७ वरून इंग्लंडची अवस्था ३ बाद १०९ अशी झाली होती. पण त्यानंतर रूट-बेअरस्टो जोडीने मैदान गाजवलं. विराट कोहली याचा कॅप्टन्सीमधील आक्रमकपणा असे सामने जिंकण्यासाठी हवा होता, पण तोच मिसिंग होता म्हणून भारत सामना हारला असा सूर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून दिसून आला.
विराट कोहली हा फलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकत नसल्याचे आता लपून राहिलेले नाही. गेले दोन-तीन वर्षे तो आपल्या फॉर्मसाठी झगडतोय. पण चौथ्या डावात जर भारताची गोलंदाजी असेल तर विराटने कधीही कर्णधार असताना सामना जिंकण्याची आशा सोडून दिली नव्हती. केवळ १५० धावा आणि दोन सत्रांचा खेळ शिल्लक असतानाही विराटच्या उत्साहवर्धक भाषणाने आणि मैदानावरील आक्रमक अंदाजामुळे भारताने याच मालिकेतील एक सामना रोमहर्षक पणे जिंकला होता. पण विराट माजी कर्णधार झाल्यावर आणि रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यावर जसप्रीत बुमराहला कर्णधारपद मिळाले. त्याला त्याची जबाबदारी म्हणावी तशी पार पाडता आली नाही. त्याचा भारताला फटका बसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. पाहा काही निवडक ट्विट्स-
--
--
--
--
--
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा संघ २८४ धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताने १३२ धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात भारतीय संघ २४५ धावांत बाद झाला आणि इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लिश फलंदाजांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली आणि सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली.
Web Title: Virat Kohli Attacking Captaincy attitude missing is real reason behind Team India loss against england in 5th Test Social media users react
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.