विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत लावली भजन-कीर्तनाला हजेरी, पाहा फोटो

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या खराब फॉर्ममुळे खूप चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:34 PM2022-07-16T13:34:28+5:302022-07-16T13:36:30+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli attended Bhajan-Kirtana with wife Anushka, see photos | विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत लावली भजन-कीर्तनाला हजेरी, पाहा फोटो

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत लावली भजन-कीर्तनाला हजेरी, पाहा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या खराब फॉर्ममुळे खूप चर्चेत आहे. मागील ३ वर्षांपासून एकही शतकीय खेळी करता आली नाही म्हणून कोहलीला विश्रांती देण्याचा सल्ला दिग्गजांनी दिला आहे. विशेष कोहलीला या खराब फॉर्मचा सामना इंग्लंडमध्ये देखील करावा लागला. विराटवर विविध स्तरावरून टीका टिप्पणी होत असताना त्याने याकडे दुर्लक्ष करत लंडनमधील भजन-कीर्तन समारंभाला हजेरी लावली आहे.

विराट कोहली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे तिथे त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा देखील आहे. या दोघांनीही लंडनमधील एका भजन-कीर्तन समारंभामध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाला पोहचलेल्या कोहली आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील निर्णायक सामना १७ जुलै रोजी रविवारी खेळवला जाईल. 

लंडनमधील भजन-कीर्तन समारंभास विराटनं लावली हजेरी
या भजन-कीर्तनाचे आयोजन प्रसिद्ध अमेरिकन गायक कृष्णा दास यांनी केलं होतं. भक्तिगीतांसाठी त्याची जगभर ख्याती आहे. कोहली आणि अनुष्काने त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे फोटो कृष्णा दास यांच्या शिष्यांपैकी एक हनुमान दास यांनी हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हनुमान दास देखील विराट-अनुष्का सोबत दिसत आहे. 

हनुमान दास यांनी केलेल्या पोस्टमुळे विराट आणि अनुष्का भजन-किर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. लंडन मधील युनियन चॅपलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

तीन वर्षांपासून शतकापासून वंचित 
लक्षणीय बाब किंग कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागील ३ वर्षांपासून एकही शतकीय खेळी करता आली नाही. त्याने शेवटचे शतक बांगलादेशविरुद्ध कोलकातामध्ये कसोटी सामन्यात झळकावले होते. त्यामुळे कोहलीचे चाहते त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोहलीची डोकेदुखी वाढत असून, त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Virat Kohli attended Bhajan-Kirtana with wife Anushka, see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.