भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची बॅट क्रिकेटच्या मैदानावर सध्या थंडावली असली तरी सोशल मीडियावर त्यानं धमाका उडवला आहे. इस्टाग्रामवरील एका पोस्टमागे सर्वाधिक रक्कम कमावणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये विराट टॉप टेनमध्ये आहे. पण, १ मार्च २०२१ ला त्यानं इस्टाग्रामवर इतिहास रचला आणि त्याच्या या विक्रमात तुमचं-आमचं मोठं योगदान आहे. इस्टाग्रमावर १०० मिलियन म्हणजेच १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा विराटनं पार केला आणि १० कोटी इस्टा फॉलोअर्स असलेला तो पहिला भारतीय आणि आशियाई सेलिब्रेटी आहे. जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये कुणाचेही इतके फॉलोअर्स नाहीत. विराट कोहलीच्या या विक्रमाचं ICCनंही कौतुक केलं आहे. ( Virat Kohli 100 million followers on Instagram )
इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगभरातील सेलिब्रेटींमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Christiano Ronaldo) हा अव्वल स्थानी आहे. इंस्टावर त्याचे २६६ मिलियन म्हणजेच २६.६ कोटी फॉलोअर्स आहेत. त्यानंतर एरियाना ग्रँडे ( २२.४ कोटी), ड्वेन जॉन्सन ( २२ कोटी), कायली जेनर ( २१.८ कोटी) यांच्या फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. १०० मिलियन फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रेटिंमध्ये केवळ चार खेळाडू आहेत. रोनाल्डोनंतर फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी ( १८.७ कोटी), ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार ( १४.७ कोटी) आणि विराट कोहली यांच्या फॉलोअर्सची संख्या १०० मिलियनच्या वर आहे. विराट कोहलीनं हातात बॉटल असूनही रोहित शर्माला पाणी दिलं नाही; दोन स्टार खेळाडूंना सोबत पाहून नेटिझन्स सुटले