Join us

26/11 Attack : विराट कोहली झाला भावूक; भारतावरील हल्ल्यावर केलं विधान

26/11 Mumbai Terror Attack : भारतावरील हल्ल्याबाबत कोहलीने एक ट्विट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 15:56 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक आहे, असे म्हटले जाते. पण कोहली हा भावूकही आहे, हे आज पाहायला मिळाले. कारण भारतावरील हल्ल्याबाबत कोहलीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कोहलीने आपल्या भावनांना वाट मोकली करून दिली आहे.

कोहलीने मुंबईवर झालेल्या २६/११ या हल्ल्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांसाठी मी श्रद्धांजली वाहतो. या साऱ्यांना कोणीही विसरू शकत नाही, असे ट्विट कोहलीने केले आहे.

मुंबईवर झालेल्या हल्ल्याविरोधात सर्वच जण ठामपणे उभे राहीलो. सुरक्षा व्यवस्थेने हा हल्ला झाला तेवव्हा महत्वाची भूमिका बजावली. या हल्ल्यात ज्यांना आपला जीव गमवावा लागला, त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच प्रार्थना करू, असे अजिंक्य रहाणेने म्हटले आहे. कोहली आणि रहाणेबरोबर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, इशांत शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनीही याबाबत ट्विट केले आहे.

 

टॅग्स :विराट कोहली26/11 दहशतवादी हल्लाअजिंक्य रहाणेइशांत शर्माचेतेश्वर पुजारा