Join us  

विराट कोहली झाला पक्का शाकाहारी, अशी बदलली लाइफ स्टाइल...

विराटमध्ये हा बदल झाला आहे तो पत्नी अनुष्का शर्मामुळे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 6:20 PM

Open in App

नवी दिल्ली : एकेकाळी भारताचा कर्णधार विराट कोहली हा अट्टल मांसाहारी होती. बटर चिकनवर तर तो नेहमीच ताव मारायचा. पण आता तो पक्का शाकाहारी झाला आहे. विराटची लाइफ स्टाइल बदलली कशी आणि कोणामुळे हे तुम्हाला माहिती आहे का...

सध्याच्या घडीला विराट हा भन्नाट फॉर्मात आहे. अनेक विक्रम तो पादाक्रांत करत आहे. या गोष्टीला जोड आहे ती त्याचा फिटनेस आणि टाएट यांची. सध्याच्या घडीला विराट डाएटवर जास्त लक्ष देताना दिसत आहे. विराट हा सध्या 'वेगन' झाला आहे. 'वेगन' राहिल्याने पचनक्रीया सुधारते, असे म्हटले जाते. त्यामुळे कोहलीने मांसाहाराला रामराम केला आहे. 

कोहली आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करतो. त्याचबरोबर फळांचाही भरपूर समावेश करतो. वेगवेगळ्या डाळी आणि कडधान्यांवरही कोहलीने भर दिलेला पाहायला मिळतो.

कोहलीच्या आयुष्यात असा आमुलाग्र बदल कोणामुळे झाला हे तुम्हाला आता जाणून घ्यायचे असेल. तर विराटमध्ये हा बदल झाला आहे तो पत्नी अनुष्का शर्मामुळे.

 

वेगन डाएट म्हणजे काय'वेगन' म्हणजे प्राण्यांपासून मिळणारी कोणतीही गोष्ट न खाणे किंवा त्यांच्यापासून बनवण्यात आलेली कोणतीही गोष्ट न वापरणे. 1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेगन डाएटमध्ये दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणं टाळण्यात येतं. 

'हे' आहेत वेगन डाएट फॉलो करण्याचे फायदे :- या डाएटमधून मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. - वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट फायदेशीर ठरतं. - शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं. - या डाएटमुळे किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. - शरीराला होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वेगन डाएट उपयोगी ठरतं. 

वेगन डाएटचे प्रकार :व्होल व्हीट वेगन डाएट : यामध्ये फळं, भाज्या, डाळ, ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यात येतो. रॉ फूड वेगन डाएट : या श्रेणीमध्ये कच्ची फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. थ्राइव डाइट :  या डाएटमध्ये व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात येतो.

टॅग्स :विराट कोहली