Join us  

अन् व्यस्त वेळापत्रकामुळे BCCIवर भडकला विराट कोहली

आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट आज बीसीसीआयवर भडकला आहे. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. नागपूरमध्ये उद्यापासून दुसरी कसोटी सुरु होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 4:25 PM

Open in App

नागपूर - विराट कोहली हा सध्याचा जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. आणि धोनीनंतर तो भारतीय क्रिकेट संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळतो आहे.  आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट आज बीसीसीआयवर भडकला आहे. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीनं संघाचं व्यस्त वेळापत्रक, सतत होणाऱ्या क्रिकेट मालिका आणि चुकीच्या नियोजनावरुन बीसीसीआयला चांगलचेच फटकारलय. कोहली म्हणाला, कोणत्याही मालिकेपूर्वी तयारीसाठी पुरेसा वेळ हवा असतो. एखाद्या संघासोबत मोठी मालिका खेळायची असल्यास तयारीसाठी एक महिना तरी वेळ हवा असतो पण आम्हाला बीसीसीयनं ठरवलेल्या वेळेनुसारच तयारी करावी लागते. 

नागपूर कसोटी सुरू होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलता होता. दुर्देवाने आम्हाला दोन मालिकांमध्ये पुरेसा वेळ मिळत नाही. मलिकेच्या तयारीसाठी किमान एक महिना वेळ मिळणे गरजेचं आहे. मात्र श्रीलंकेविरूद्धची मालिका संपताच दोन दिवसांनी आम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचं आहे. त्यामुळे आम्हाला मालिकेची तयारी करायला वेळ मिळत नाही. खेळाडूंची कामगिरी खराब झाल्यास त्यांना चौफेर टीकेला सामोरं जावं लागतं, मात्र खेळाडूंना तयारीसाठी किती वेळ मिळतो याचा विचार केला जात नाही. इतर संघाना तयारीसाठी बराच वेळ मिळतो. त्यांच्या तुलनेने आम्हाला फारच कमी वेळ मिळतो, असे कोहली म्हणाला.

श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर त्यांच्यासोबत तीन वन-डे आणि तीन  टी-20 सामन्याची मालिका खेळेल. त्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोहली म्हणाला की. अति क्रिकेट खेळण्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. एखाद्या दौऱ्यापूर्वी तयारीसाठी तुम्हाला पुरेसा वेळ हवा असतो. पण आफ्रिका दौऱ्यापूर्वी आम्हाला फक्त दोन दिवसांचा वेळ आहे. आमच्याजवळ कोणताही पर्याय नाही त्यामुळे आम्हाला आमच्या फिटनेसवर लक्ष आधिक केंद्रित करावं लागत आहे. आम्हाला एक महिन्याची सुट्टी मिळाली नाही पण आम्ही आमची तयारी पुर्ण केली आहे. मिळालेल्या वेळामध्ये आम्हाला क्रिकट प्रक्टिससह आमच्या फिटनेसवरही लक्ष द्यावं लागते. 

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेतमध्ये बोलताना कोहली म्हणाला, सध्या आमचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. आम्हाला तयारीसाठी वेळ हवा असतो. जेणेकरुन भविष्यात आम्हाला त्याचा फायदा होईल. दुसऱ्य़ा संघाप्रमाणे आपल्या खेळाडूंना पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यावेळी इतर संघ परदेशी दौऱ्यावर जातो तेव्हा त्यांना तयारीसाठी एक महिन्यापेक्षा आधिक कालावधी असतो. पण आपल्या संघाचा विचार केल्यास आम्हाला वेळ मिळत नाही.  

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ