विराट कोहली, बुमराहला विंडीज दौऱ्यातून विश्रांती

आश्विन, राहुल, कुलदीप यांचे पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:29 AM2022-07-15T08:29:29+5:302022-07-15T08:30:00+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Bumrah rested from West Indies tour team india team declared | विराट कोहली, बुमराहला विंडीज दौऱ्यातून विश्रांती

विराट कोहली, बुमराहला विंडीज दौऱ्यातून विश्रांती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध २९ जुलैपासून होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.  विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच विंडीजविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला होता. त्यातून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. अलीकडे हर्नियाची शस्त्रक्रिया झालेला लोकेश राहुल याच्यासह कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन झाले. दोघेही फिट असल्यास त्यांचा विचार केला जाईल.  कुलदीप यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्थानिक मालिकेदरम्यान हाताला दुखापत झाली होती.

रविचंद्रन आश्विनचेदेखील संघात पुनरागमन झाले. तो मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला होता. पहिला टी-२० सामना त्रिनिदाद येथे होईल. त्यानंतरचे दोन सामने सेंट किट्समध्ये खेळविले जातील. नंतरचे दोन सामने अमेरिकेतील लॉडेरहिल येथे होणार आहेत.

विराटने मागितली विश्रांती
खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटने विंडीजच्या संपूर्ण दौऱ्यातून विश्रांती मागितल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. लेग स्पिनर युझवेंद्र चहल यालादेखील विश्रांती देण्यात आली.  रोहित, ऋषभ आणि हार्दिक वनडे मालिकेत खेळणार नाहीत; पण टी-२० मालिकेचा भाग असतील. शिखर धवन वनडे मालिकेत नेतृत्व करेल.  लेग स्पिनर रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांनी स्थान कायम राखले, तर अर्शदीपसिंग हादेखील संघात परतला. वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला मात्र स्थान देण्यात आलेले नाही.

भारतीय टी-२० संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

विंडीज दौऱ्याचे वेळापत्रक
वनडे मालिका 

२२ जुलै     : पहिला वनडे सामना
२४ जुलै     : दुसरा वनडे
२७ जुलै     : तिसरा वनडे

टी-२० मालिका 
२९ जुलै     : पहिली टी -२० लढत
०१ ऑगस्ट     : दुसरी टी -२०
०२ ऑगस्ट     : तिसरी टी- २०
०६ ऑगस्ट     : चौथी टी -२०
०७ ऑगस्ट     : पाचवी टी- २०

Web Title: Virat Kohli Bumrah rested from West Indies tour team india team declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.