नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला रोखणं जगातील कोणत्याही गोलंदाजाला सहज शक्य होत नाही. त्यामुळे त्याची प्रत्येक खेळी ही विक्रमाला कवेत घेणारी असते. त्याने आतापर्यंत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडले. त्याच्या धावांची भूक अजूनही कायम आहे आणि भविष्यात त्याच्याकडून आणखी विक्रम झालेले पाहायला मिळतील. पण, तेंडुलकरचा एक विक्रम कोहली कधीच मोडू शकत नाही, असा दावा भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने केला आहे.
India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग म्हणाला,''विराट हा सध्याच्या घडीचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याचा फॉर्म आणि धावांची भूक त्याला सर्वोतम फलंदाज बनवते. तो सचिनचे अधिकाधिक विक्रम मोडेल, असा मला विश्वास आहे.''
विराटने 239 वन डे क्रिकेटमध्ये 60.3 च्या सरासरीनं 11520 धावा केल्या आहेत आणि तेंडुलकरचा वन डेतील 49 शतकांचा विक्रम तोडण्यापासून तो सात शतकं दूर आहे. शिवाय कोहलीला तेंडुलकरच्या 18426 धावांचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. कसोटीतही कोहलीनं 25 शतकं केली आहेत आणि तेंडुलकर 51 शतकांसह आघाडीवर आहे. पण, तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधील एक विक्रम कोहली मोडू शकणार नाही. सेहवाग म्हणाला,''तेंडुलकरचा एक विक्रम जो कोणीच मोडू शकत नाही. तो म्हणजे 200 कसोटी सामने खेळण्याचा. मला नाही वाटत की विराट हा विक्रम मोडू शकेल.''
रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल
नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ
सेहवाग पुढे म्हणाला,''ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ आणि कोहली यांच्यात तुलना होत आहे. पण, कोहली हा स्मिथपेक्षा सर्वोत्तम फलंदाज आहे. या दोघांपैकी कोणाची फलंदाजी पाहण्यासारखी वाटते, तर ती कोहलीची. तो जगातील अव्वल फलंदाज आहे.''
विंडीजला धक्का; 'गब्बर'ची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार
कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम
टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?