Join us  

Virat Kohli Centuries List : विराट कोहलीला थांबवणे अशक्य...लवकरच सचिनच्या विक्रमाची बरोबरी; पाहा 75 शतकांची लिस्ट

Virat Kohli Centuries List : अहमदाबादमध्ये कोहलीचे 'विराट' रुप पाहायला मिळाले. आज त्याने 75वे शतक झळकावले असून, लवकरच सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 3:51 PM

Open in App

Virat Kohli Centuries List : गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. त्याबदल्यात भारताकडून शुभमन गिलनंतर विराट कोहलीने शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला मागे टाकले. विराट कोहलीचे हे कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक आहे.

विराट कोहलीने जवळपास साडेतीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याच्या बॅटमधून शेवटचे कसोटी शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी झळकले होते. आता 1205 दिवस आणि 41 डावांनंतर त्याचे कसोटी शतक आले आहे. यासह विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांची संख्याही 75 वर पोहोचली आहे.

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपुष्टात आल्याने तो कसोटी क्रिकेटमध्येही नवे विक्रम करू शकतो. किंग कोहलीचे टी-20 क्रिकेटमध्येही शतक आहे. सध्या सचिन तेंडुलकर 100 शतकांसह  यादीत टॉपवर आहे, तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकेसचिन तेंडुलकर - 664 सामने, 100 शतकेविराट कोहली - 494 सामने, 75 शतकेरिकी पाँटिंग - 560 सामने, 71 शतके

विराट कोहलीची एकूण आंतरराष्ट्रीय शतके - 75वनडेत शतक - 46कसोटीत शतक - 28T20 - 01 शतक

विराट कोहलीची सर्व एकदिवसीय शतके*   धावा, विरुद्ध,कुठे,दिनांक1. 107 श्रीलंका, कोलकाता 24 डिसेंबर 20092. 102* बांगलादेश, ढाका 11 जानेवारी 20103. 118 ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम 20 ऑक्टोबर 20104. 105 न्यूझीलंड, गुवाहाटी 28 नोव्हेंबर 20105. 100* बांगलादेश, ढाका 19 फेब्रुवारी 20116. 107 इंग्लंड, कार्डिफ 16 सप्टेंबर 20117.112* इंग्लंड, दिल्ली 17 ऑक्टोबर 20118. 117 वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम 02 डिसेंबर 20119. 133* श्रीलंका, होबार्ट 28 फेब्रुवारी 201210. 108 श्रीलंका, ढाका 13 मार्च 201211. 183 पाकिस्तान, ढाका 18 मार्च 201212. 106 श्रीलंका, हंबनटोटा 21 जुलै 201213. 128* श्रीलंका, कोलंबो 31 जुलै 201214. 102 वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 05 जुलै 201315. 115 झिम्बाब्वे, हरारे 24 जुलै 201316. 100* ऑस्ट्रेलिया जयपूर 16 ऑक्टोबर 201317. 115* ऑस्ट्रेलिया, नागपूर 30 ऑक्टोबर 201318. 123 न्यूझीलंड, नेपियर 19 जानेवारी 201419. 136 बांगलादेश, फतुल्ला 26 फेब्रुवारी 201420. 127 वेस्ट इंडिज, धर्मशाला 17 ऑक्टोबर 201421. 139* श्रीलंका, रांची 16 नोव्हेंबर 201422. 107 पाकिस्तान, अॅडलेड 15 फेब्रुवारी 201523. 138 दक्षिण आफ्रिका, चेन्नई 22 ऑक्टोबर 201524. 117 ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 17 जानेवारी 201625. 106 ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा 20 जानेवारी 201626 154* न्यूझीलंड मोहाली 23 ऑक्टोबर 201627. 122 इंग्लंड, पुणे 15 जानेवारी 201728. 111* वेस्ट इंडिज, किंग्स्टन 06 जुलै 201729. 131 श्रीलंका, कोलंबो 31 ऑगस्ट 201730. 110* श्रीलंका, कोलंबो 03 सप्टेंबर 201731. 121 न्यूझीलंड, मुंबई 22 ऑक्टोबर 201732. 113 न्यूझीलंड, कानपूर 29 ऑक्टोबर 201733. 112 दक्षिण आफ्रिका, डर्बन 01 फेब्रुवारी 201834. 160* दक्षिण आफ्रिका केप टाउन 07 फेब्रुवारी 201835. 129* दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन 16 फेब्रुवारी 201836. 140 वेस्ट इंडिज, गुवाहाटी 21 ऑक्टोबर 201837. 157* वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम 24 ऑक्टोबर 201838. 107 वेस्ट इंडिज, पुणे 27 ऑक्टोबर 201839. 104 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 15 जानेवारी 201940. 116 ऑस्ट्रेलिया, नागपूर 05 मार्च 201941. 123 ऑस्ट्रेलिया, रांची 08 मार्च 201942. 120 वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 11 ऑगस्ट 201943. 114* वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 14 ऑगस्ट 201944. 113 बांगलादेश, चितगाव 10 डिसेंबर 202245. 113 श्रीलंका, गुवाहाटी 10 जानेवारी 202346. ​​166* श्रीलंका, तिरुवनंतपुरम 15 जानेवारी 2023

विराट कोहलीची कसोटी शतके:*   धावा, विरुद्ध, कुठे, दिनांक1. 116 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 24 जानेवारी 20122. 103 न्यूझीलंड, बेंगळुरू 31 ऑगस्ट 20123. 103 इंग्लंड, नागपूर 13 डिसेंबर 20124. 107 ऑस्ट्रेलिया, चेन्नई 22 फेब्रुवारी 20135. 119 दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग 18 डिसेंबर 20136. 105* न्यूझीलंड, वेलिंग्टन 14 फेब्रुवारी 20147. 115 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 9-13 डिसेंबर 2014 (पहिला डाव)8. 141 ऑस्ट्रेलिया, अॅडलेड 9-13 डिसेंबर 2014 (दुसरा डाव)9. 169 ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 26 डिसेंबर 201410. 147 ऑस्ट्रेलिया, सिडनी 06 जानेवारी 201511. 103 श्रीलंका, गॅले 12 ऑगस्ट 201512. 200 वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड 21 जुलै 201613. 211 न्यूझीलंड, इंदूर 08 ऑक्टोबर 201614. 167 इंग्लंड, विशाखापट्टणम 17 नोव्हेंबर 201615. 235 इंग्लंड, मुंबई 08 डिसेंबर 201616. 204 बांगलादेश, हैदराबाद 09 फेब्रुवारी 201717. 103* श्रीलंका, गॅले 26 जुलै 201718. 104* श्रीलंका, कोलकाता 16 नोव्हेंबर 201719. 213 श्रीलंका, नागपूर 24 नोव्हेंबर 201720. 243 श्रीलंका, दिल्ली 02 डिसेंबर 201721. 153 दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन 13 जानेवारी 201822. 149 इंग्लंड, बर्मिंगहॅम 01 ऑगस्ट 201823. 103 इंग्लंड, नॉटिंगहॅम 18 ऑगस्ट 201824. 139 वेस्ट इंडिज, राजकोट 04 ऑक्टोबर 201825. 123 ऑस्ट्रेलिया, पर्थ 14 डिसेंबर 201826. 254* दक्षिण आफ्रिका, पुणे 10 ऑक्टोबर 201927. 136 बांगलादेश, कोलकाता 22 नोव्हेंबर 201928. 129* ऑस्ट्रेलिया अहमदाबाद 12 मार्च 2023

T20 मध्ये विराट कोहलीचे शतक1. 122* अफगाणिस्तान दुबई 8 सप्टेंबर 2022

टॅग्स :विराट कोहलीऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियासचिन तेंडुलकर
Open in App