India vs England, 5th T20 : भारतानं २० षटकांत उभ्या केलेल्या २ बाद २२४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून चांगले प्रत्युत्तर मिळाले. पण, फॉर्मात असलेले फलंदाज माघारी परतले अन् इंग्लंडची सामन्यावरील पकड निसटली. इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६ धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटला मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार मिळाला. तर या सामन्यात उत्तम गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमार मॅन ऑफी दी मॅचचा मानकरी ठरला. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं मोठी घोषणा केली. विराट कोहलीनं विजयी चषकासह जे केलं ते साऱ्यांनी पाहिलं अन्...
- पहिली ट्वेंटी-२० - शिखर धवन ( ४) व लोकेश राहुल ( १), भागीदारी २ धावा
- दुसरी ट्वेंटी-२० - इशान किशन ( ५६) व लोकेश राहुल (०), भागीदारी ० धाव
- तिसरी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १५) व लोकेश राहुल ( ०), भागीदारी ७ धावा
- चौथी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( १२ ) व लोकेश राहुल ( १४), भागीदारी २१ धावा
- पाचवी ट्वेंटी-२० - रोहित शर्मा ( ६४) व विराट कोहली ( ८०*), भागीदारी ९४ धावा
विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम
या संपूर्ण मालिकेत विराट कोहलीनं चार वेगवेगळ्या जोड्या सलामीला खेळवल्या. त्यात पाचव्या सामन्यात रोहित शर्मासोबत विराट स्वतः सलामीला आला. विराट कोहली ८व्यांदा टीम इंडियासाठी सलामीला येणार आहे. जून २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध तो अखेरचा सलामीला आला होता. त्यानं सलामीवीर म्हणून ७ ट्वेंटी-20 सामन्यांत १९८ धावा केल्या आहेत. त्यात एक अर्धशतक ( ७० वि. न्यूझीलंड, २०१२) झळकावले आहे. या सामन्यानंतर विराट म्हणाला,'' आता आमच्याकडे मजबूत मधली फळी आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दोन चांगल्या फलंदाजांना अधिकाधिक चेंडू खेळण्यास मिळायला हवेत. मला रोहित शर्मासोबत सलामीला यायला नक्की आवडेल आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येही हाच फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न असेल.'' विराटनं अप्रत्यक्षपणे वर्ल्ड कप स्पर्धेतही सलामीला खेळणार असल्याचे संकेत दिले.