मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : मैदानात अशोभनीय कृत्य केल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीवर बंदी येण्याची शक्यता आहे. कोहली हा जास्त आक्रमक असतो. त्यामुळे त्याच्याकडून बऱ्याच खेळाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी घडत असतात. पण आता तर त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-20 सामन्यांवर बंदी येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात एक धाव घेतला कोहली ब्युरन हेंड्रीक्स या गोलंदाजाच्या जवळून धावत गेला आणि त्यानंतर त्याच्या खांद्याला जोरदार टक्कर मारली. ही गोष्ट सर्वांनीच पाहिली. त्यामुळे सामना संपल्यावर कोहलीला आयसीसीने चांगलेच फटकारले. याप्रकरणी आयसीसीने कोहलीवर कारवाई केली आहे.
खेळाडूला टक्कर मारणे, दुखावणे हे सभ्य गृहस्थांच्या क्रिकेट या खेळामध्ये बसत नाही. त्यामुळे आयसीसीने या चुकीसाठी कोहलीला एक डिमेरिट गुण दिला आहे. यापुढे कोहलीच्या नावावर दोन डिमेरिट गुण होते. आतापर्यंत कोहलीच्या नावावर तीन डेमेरिट गुण जमा झाले आहेत. जर एखाद्या खेळाडूच्या नावावर चार डिमेरीट गुण जमा झाले की, त्या खेळाडूवर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-20 सामन्यांवर बंदी घातली जाते. त्यामुळे जर आता कोहलीला एक डिमेरिट गुण मिळाला तर त्याच्यार बंदी येऊ शकते.
नेमके काय घडले होते...भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात पराबव पत्करावा लागला. पण या पराभवाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक वाईट बातमी आहे. कारण या सामन्यात कोहली मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूबरोबर भिडला होता. पण हे वर्तन क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळाला शोभेसे नाही. त्यामुळेच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) कोहलीला चांगलेच धारेवर धरले आहे.
हा सामना बंगळुरुमध्ये झाला. भारताच्या संघाची पहिली फलंदाजी होती. ही गोष्ट घडली ती पाचव्या षटकामध्ये. ब्युरन हेंड्रीक्स यावेळी गोलंदाजी करत होता. या षटकात धाव घेतला कोहली त्याच्या जवळून धावत गेला आणि त्यानंतर त्याच्या खांद्याला जोरदार टक्कर मारली. ही गोष्ट मैदानावरील पंचांसहित साऱ्यांनी पाहिली. यावेळी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आली आणि त्यांनी कोहलीला याबाबत जब विचारला. जेव्हा ही गोष्ट पुन्हा पाहण्यात आली तेव्हा त्यामध्ये कोहलीची चूक असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता आयसीसीने कोहलीवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. आता कोहलीवर दंड आकारण्यात येऊ शकतो, त्याचबरोबर त्याला डिमेरिट पॉइंटही देण्यात येऊ शकतो. या गोष्टीचा विपरीत परीणाम कोहलीच्या पुढील सामन्यांवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.