Virat Kohli centuary : विराट कोहलीने हैदराबादविरूद्ध शतकी खेळी करून 'टायगर जिंदा है' हे दाखवून दिले. याशिवाय कमी स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देखील कोहलीने उत्तर दिल्याचे दिसते. यजमान हैदराबादला पराभवाची धूळ चारून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. १८७ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचे सलामीवीर फाफ डूप्लेसिस आणि विराट कोहली यांनी अप्रतिम खेळी केली. किंग कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. तब्बल चार वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक ठोकल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.
मोठ्या कालावधीनंतर आयपीएलमध्ये शतक झळकावल्यानंतर किंग कोहलीने जोरदार सेलिब्रेशन केले. मैदानातच पत्नी अनुष्का शर्माशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. यावरून बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरकेने कोहलीवर निशाणा साधला. खरं तर केआरके नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ट्विट करत असतो. आता कोहलीच्या सेलिब्रेशनचा मुद्दा उपस्थित करत त्याने आरसीबीच्या खेळाडूची खिल्ली उडवली.
"कोहली भाईने १०० धावा करून एवढे नाटक केले, जसे काय आयपीएल २०२३ चा किताबच जिंकला आहे. भाई साहेब @imVkohli तू नाटक केले नसते तर खूप चांगले झाले असते", अशा शब्दांत केआरकेने कोहलीची खिल्ली उडवली.
'विराट' शतकानंतर कोहलीने पत्नीला केला व्हिडीओ कॉल; अप्रतिम खेळीचं अनुष्काकडून कौतुक
आरसीबीचा मोठा विजय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. हेनरिक क्लासेनच्या (१०४) शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने आरसीबीसमोर १८७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कोहली आणि डूप्लेसिस यांनी पहिल्या बळीसाठी १७२ धावांची भागीदारी नोंदवली. विराटने (१००) तर कर्णधार डूप्लेसिसने (७१) धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर आरसीबीने ८ गडी आणि ४ चेंडू राखून मोठा विजय साकारला.