Join us  

'नाटू-नाटू'नंतर आता 'लुंगी' डान्स; Virat Kohli मैदानात थिरकला, पाहा Video...

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने केला डान्स. पाहा व्हिडिओ.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 3:37 PM

Open in App

IND vs AUS : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली अनेकदा मैदानात डान्स करताना दिसतो. त्याचे डान्सचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा त्याचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आझ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND vs AUS) तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. क्षेत्ररक्षणासाठी जाण्यापूर्वी विराट कोहलीने सीमारेषेजवळ आपल्या नृत्याने चाहत्यांचे मनोरंजन केले. 

यावेळी विराटने लुंगी डान्स गाण्याची स्टेप करताना दिसला. त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, सीरिजच्या पहिल्या वनडे दरम्यान विराट कोहलीने नुकताच ऑस्कर जिंकलेल्या नाटू-नाटू गाण्याच्या स्टेप्स करताना दिसला होता. त्याचा तो डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत बरोबरी साधली. अशा परिस्थितीत आता तिसरा एकदिवसीय सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. भारतीय संघाने या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भारतीय  इलेवन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया इलेवन : डेविड वार्नर, ट्रैविस हेड, मिचेल मार्श, स्टीवन स्मिथ (कप्तान), मारनस लाबुस्चगने, एलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, एश्टन एगर, सीन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम ज़म्पा.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App