Join us  

Virat Kohli Daughter News: कोहलीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा IIT पदवीधर अन् २४ लाख पगार, अमेरिकेत घेणार होता पुढचं शिक्षण!

Virat Kohli Daughter News: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आणि खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 3:53 PM

Open in App

Virat Kohli Daughter News: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आणि खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. पण यात एक धक्कादायक पातळी गाठली गेली आणि विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकीच एका ट्रोलरनं दिली. संपूर्ण देशभरात याबाबत कठोर शब्दांत निंदा व्यक्त करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याबाबत पुढाकार घेत सायबर सेलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या युझरचा शोध लावला आहे. कोहलीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्या अल्लडबाजाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब अशी की धमकी देणारा उच्चशिक्षीत व्यक्त असून त्याचं आयआयटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. 

विराट कोहलीच्या मुलीला दिल्या गेलेल्या धमकीनंतर दिल्लीच्या महिला आयोगानं यावर कारवाई केली. दिल्ली महिला आयोगानं याप्रकरणी पोलिसांना नोटीस धाडली आणि संबंधित प्रकरणात टिप्पणी करणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी केली. यासोबतच कोहलीच्या मॅनेजरनही पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर बुधवारी ज्या अकाऊंटवरुन धमकी देण्यात आली होती त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं आणि हैदराबादहून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. त्याला मुंबईत आणण्यात आलं. 

IIT पदवीधर आहे आरोपीसुत्रांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव रामनागेश श्रीनिवास अगुबथिनी (Ramnagesh Srinivan Akubathini) असं असून तो २३ वर्षांचा आहे. रामनागेश यानं दोन वर्षांपूर्वीच आयआयटी हैदराबादमधून पदवीपर्यंतंच शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर एका नामांकित फूट अॅप कंपनीत तो नोकरी करत होता. या कंपनीत त्याला तब्बल २४ लाख रुपया वार्षिक पॅकेज होतं. नुकतंच त्यानं स्वत:हून नोकरी सोडली होती आणि अमेरिकेत जाऊन मास्टर डिग्री करण्याची तयारी सुरू केली होती. रामनागेशचे वडिलांना अजूनही कळालेलं नाही की त्यांच्या मुलाला का अटक करण्यात आली आहे. ते देखील मुलासह हैदराबादहून मुंबईत दाखल झाले आहेत. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App