Virat Kohli: विराट कोहलीविरोधात खेळलं जातंय डर्टी पॉलिटिक्स, पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केला दावा

Virat Kohli News: येत्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली हा भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट संघांचे नेतृत्व सोडू शकतो आणि त्याच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:41 PM2021-09-13T14:41:11+5:302021-09-13T14:43:19+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli: Dirty politics being played against Virat Kohli, claims former Pakistan captain | Virat Kohli: विराट कोहलीविरोधात खेळलं जातंय डर्टी पॉलिटिक्स, पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केला दावा

Virat Kohli: विराट कोहलीविरोधात खेळलं जातंय डर्टी पॉलिटिक्स, पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केला दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इस्लामाबाद -  येत्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली हा भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट संघांचे नेतृत्व सोडू शकतो आणि त्याच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, विराट कोहलीविरोधात डर्टी पॉलिटिक्स खेळलं जातंय, असा खळबळजनक दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने केला आहे. (Dirty politics being played against Virat Kohli, claims former Pakistan captain)

प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत आलेल्या वृत्तानुसार विराट कोहली फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पाऊल उचलू शकतो. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मायदेशाबरोबरच परदेशातही जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र विराटला अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ही बाब त्याच्या विरोधात जात आहे. 

याच मुद्द्यावरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्ट याने कोहलीच्या आजूबाजूला गलिच्छ पॉलिटिक्स होत असल्याचा दावा केला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराट कोहलीच्या काही निर्णयांबाबत संघ व्यवस्थापन नाराज होते. सलमान बटने सांगितले की, भारताच्या यशामध्ये विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच टी-२० विश्वचषकासोबत त्याच्या कर्णधारपदाबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही.

नुकत्याच आटोपलेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. आता जर भारताला टी-२० विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही तर कोहलीला रोहित शर्मासाठी कर्णधारपदाची जागा मोकळी करून देण्याची सूचना केली जाऊ शकते. रोहित शर्मा एक उत्तम खेळाडू आणि कर्णधार आहे. मात्र मात्र ही चर्चा करण्याची ही वेळ नाही. भारतीय संघ सध्या क्रिकेटच्या सर्व प्रकारात अव्वल आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत सध्यातरी असा निर्णय घेणे योग्य ठरणान नाही.  

Web Title: Virat Kohli: Dirty politics being played against Virat Kohli, claims former Pakistan captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.