लंडन : भारतीय संघात अनेक उणिवा असल्याची जाहीर कबुली देत इंग्लंडविरुद्ध ४-१ ने झालेला मालिका पराभव कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी मान्य केला. त्याचवेळी पराभवानंतर आमूलाग्र बदल करण्याची कुठलीही गरज नाही, असेही विराटने ठासून सांगितले.
दौऱ्यात इंग्लंड संघ भारताच्या तुलनेत कमकुवत मानला गेला. फलंदाजीत अनेकदा अडचणींना तोंड देत या संघाने मोक्याच्या क्षणी भारतावर वर्चस्व गाजवित विजय संपादन केला. पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ११८ धावांनी पराभव झाल्यानंतर विराट म्हणाला,‘ही मालिका आमच्या विरुद्ध का गेली, हे समजू शकतो पण त्यासाठी मोठ्या बदलाची गरज नाही. प्रत्येक सामन्यात स्पर्धात्मक स्थितीत तुमचे पारडे जड राहिल्यास आपण चांगले डावपेच आखत आहोत हे सिद्ध होते. द. आफ्रिका आणि इंग्लंड दौºयातील पराभव मान्य करणे माझ्यासाठी कठीण नाही. पण कुठल्या स्थितीत हरलो याला महत्त्व असते. चौथ्या कसोटीतील पराभवानंतर हार मानणार नाही, असे मी म्हटले होते. अखेरच्या सामन्यात तसेच केले. संघात काही उणिवा आहेत. आम्ही मोक्याच्या क्षणी लाभ घेण्यात अपयशी ठरलो.’
यजमान इंग्लंडने परिस्थितीचा लाभ आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे घेतल्याचे सांगून आघाडीची फळी लवकर गुंडाळल्यानंतरही त्यांक़्ह्या तळाच्या फलंदाजांनी आमची परीक्षा घेतल्याचे विराट कोहलीने यावेळी मान्य केले. (वृत्तसंस्था)
>जिंकण्यासाठी खेळतो...
सामन्याआधी रवी शास्त्री यांनी विदेश दौरा करणारा हा सर्वोत्कृष्ट संघ असल्याचे म्हटले होते, विराटला यासंदर्भात छेडताच तो म्हणाला,‘ का नाही. आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला काय वाटते’ यावर पत्रकाराने मी निश्चित सांगृ शकणार नाही, असे उत्तर देताच विराट म्हणाला,‘हा तुमचा दृष्टिकोन असेल. धन्यवाद...’ विदेशात परिस्थितीचा लाभ घेण्यात अपयश आल्याचे सांगून विराट म्हणाला,‘ एखादी कसोटी जिंकून आनंदी होण्यापेक्षा मालिका विजय हे आमचे लक्ष्य होते. मालिकेच्या निकालावर मी नाराज आहे, पण प्रत्येक सामना जिंकण्याच्याच इराद्याने खेळलो.’ मालिकेत विराटने सर्वाधिक धावा केल्या पण संघाचा पराभव तो टाळू शकला नाही.जेम्स अॅन्डरसन व माझ्यात वर्चस्वाची स्पर्धा होती. आमच्यात कुठलेही वितुष्ट नसल्याचे विराटने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
Web Title: Virat Kohli does not need any change in team after losing series - Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.