Virat Kohli vs David Warner, IPL 2022 RCB vs DC: : शनिवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिल्ली कॅपिटल्सला १६ धावांनी पराभूत केले. RCB कडून दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके ठोकत संघाला १८९ धावा करून दिल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक ठोकले. पण त्याचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यास अपुरे पडले. वॉर्नर बाद झाल्यानंतर विराटने त्याच्यासमोर जात आनंद साजरा केला. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
सामना सुरू असताना १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने डेव्हिड वॉर्नर फटकेबाजी करत होता. त्यावेळी स्पिनर हसरंगाच्या षटकात डेव्हिड वॉर्नरने स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या पायाला लागला. अंपायरने त्याला नाबाद ठरवले होते, पण DRS मध्ये तो बाद असल्याचे निष्पन्न झाले. तो बाद असल्याचे समजताच विराटने त्याच्या समोर जात आक्रमकपणे उडी मारली आणि आनंद साजरा करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पाहा व्हि़डीओ-
विराटची ही कृती काही चाहत्यांना पटली. तर काहींनी विराटवर टीका केली.
दरम्यान, वॉर्नरच्या विकेटमुळे DRSचा वादही उफाळून आला. खरे पाहता DRS च्या वेळी चेंडू ज्या रेषेत जात होता, त्या रेषेत चेंडू बाहेरच्या दिशेला जाणे अपेक्षित होते. पण तसे न होता, DRS मध्ये चेंडू सरळ रेषेत येताना दाखवल्याने बॉल ट्रँकिंगमध्ये चेंडू स्टंपवर लागल्याचे दिसले आणि वॉर्नरला बाद ठरवण्यात आले. वॉर्नरच्या या विकेटवरून समालोचकांमध्येही चर्चा रंगल्याचे दिसले. पण पंचांनी निर्णय दिल्यामुळे त्याबाबत काहीही बोलता येऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
सामन्याबाबत बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना बंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यावर रिषभ पंतने १७ चेंडूत ३४ धावा केल्या. पण अखेर दिल्लीला पराभवाचा सामना करावाच लागला.
Web Title: Virat Kohli does Wild Celebrations after David Warner gets Out by DRS Controversy IPL 2022 RCB vs DC Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.