Join us  

आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर

गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १० स्थानांनी प्रगती करीत १३ व्या, भारताचा भुवनेश्वर कुमार १९ व्या आणि दीपक ४० व्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 8:25 AM

Open in App

दुबई : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर पडला आहे. तो आता ११ व्या स्थानावर असून, लोकेश राहुल पाचव्या, रोहित शर्मा १३ व्या  आणि सूर्यकुमार यादव ५९ व्या स्थानावर पोहोचला. टी-२० विश्वचषकानंतर विराटने या प्रकारात नेतृत्व सोडले होते. खासगी कामामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळू शकला नाही.गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १० स्थानांनी प्रगती करीत १३ व्या, भारताचा भुवनेश्वर कुमार १९ व्या आणि दीपक ४० व्या स्थानावर आहे. बांगलादेशचा महेदी हसन ६ स्थानांनी प्रगती करीत १२ व्या आणि शरीफुल इस्लाम तीन स्थानांनी प्रगती करीत ४० व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर कायम आहे. शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आला. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा एकही खेळाडू पहिल्या दहामध्ये नाही. पाकिस्तानचा बाबर आझम फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, त्याचे ३० गुणांचे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीभारतीय क्रिकेट संघ
Open in App