Join us  

Virat Kohli Rohit Sharma: "रोहित रडत होता, मी रडतो होतो अन् मग.."; विराटने सांगितली 'त्या' खास क्षणाची आठवण

Virat Kohli about Rohit Sharma, T20 World Cup 2024: भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट-रोहित दोघेही भावनिक झाल्याचे अख्ख्या देशाने पाहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 1:42 PM

Open in App

Virat Kohli about Rohit Sharma, T20 World Cup 2024: भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी संयमी कामगिरी करत सात धावांनी आफ्रिकेचा पराभव केला आणि १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणली. भारतीय संघ गुरुवारी ही ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाला. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केल्यानंतर टीम इंडिया मुंबईत आली. येथे संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये BCCIने आयोजित केलेल्या कार्यक्रमात साऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी स्टार खेळाडूंनी चाहत्यांशी संवाद साधताना आठवणी सांगितल्या. यातच रनमशिन विराट कोहलीने आपल्या आणि रोहित शर्माच्या नात्याबाबत एक आठवण सांगितली.

विराट-रोहितच्या नात्यावर किंग कोहली म्हणाला...

"भारताने जेव्हा वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्व खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आम्हाला नेहमीच विश्वचषक जिंकायचा होता. रोहित आणि मी, आम्ही खूप दिवसांपासून हा प्रयत्न करत होतो. वानखेडेवर ट्रॉफी परत आणणे ही खूप खास भावना आहे. आम्ही गेली १५ वर्षे खेळत आहोत. रोहितला इतका भावुक झालेला मी पहिल्यांदाच पाहतोय. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो रडत होता, मी रडत होतो, आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली... तो दिवस मी कधीच विसरणार नाही," अशा शब्दांत विराट कोहलीने वर्ल्डकप जिंकल्यानंतरच्या त्या क्षणाचे वर्णन केले.

वानखेडेवर रोहित काय म्हणाला?

"मुंबई कधीही निराश करत नाही. आमचे जोरदार स्वागत झाले. संघाच्या वतीने आम्ही चाहत्यांचे आभार मानतो. विजयानंतर आता मला खूप आनंद वाटतो आहे. सर्वात खास क्षण तो होता जेव्हा भारतीय कर्णधार म्हणून मी T20 विश्वचषक उंचावला. फायनलमध्ये शेवटचे षटक टाकल्याबद्दल आणि भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल हार्दिक पांड्याचेही विशेष कौतुक. शेवटचे षटक टाकल्याबद्दल त्याला सलाम. तुम्हाला कितीही धावांची गरज असली तरी ते षटक टाकण्यासाठी नेहमीच खूप दडपण असते. त्याने ते करून दाखवले त्यासाठी त्याचे कौतकच आहे," असे रोहित शर्मा म्हणाला.

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ