Virat Kohli Anushka Sharma Depression: चित्रपट निर्माता कमाल रशीद खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. केआरके कधी कधी बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दल अशी मते व्यक्त करतो की त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण आता मात्र त्याने थेट भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबाबत विचित्र मत व्यक्त केले. भारतीय संघाने आशिय कपमध्ये पाकिस्तान विरूद्धचा सामना जिंकला. त्यात विराट कोहली आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही, पण धावांचा पाठलाग करताना त्याने संघासाठी उपयुक्त अशा ३५ धावा केल्या. मात्र भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला लक्ष्य करताना केआरकेने त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याबद्दल कमेंट केली. त्याने विराटच्या संघातील निवडीवरही प्रश्न उपस्थित केले.
केआरकेने सर्वप्रथम अनुष्का आणि विराटवर एक ट्विट केले आहे. खरंतर, एका मुलाखतीदरम्यान विराटने स्वत: डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. आता यावर केआरकेने ट्विट करून लिहिले- 'विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटर आहे ज्याला डिप्रेशनची समस्या आहे. एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचा हा परिणाम आहे. अनुष्कानेच विराटच्या डोक्यात ही गोष्ट भरवून दिली असेल की विराटला डिप्रेशनची समस्या आहे.' मात्र, अनेक लोकांनी टीका केल्यानंतर केआरकेने हे ट्विट डिलीट केले.
यानंतर त्याने पुन्हा ट्विट केले आणि संघाच्या निवडकर्त्यांनाही प्रश्न विचारले. केआरकेने लिहिले- 'मला समजत नाहीये की विराट कोहली सारख्या एका उत्तर भारतीय मानसिकदृष्ट्या बलवान अशा विराट कोहलीला डिप्रेशनची समस्या कशी आली. त्यातही विराटने स्वत: सांगितले की तो डिप्रेशनचा बळी आहे, मग २०२२ मध्ये आशिया कप साठी निवडकर्त्यांनी त्याला कसे निवडले? निवड समितीच्या लोकांनाही नैराश्याची समस्या आहे का?' केआरकेच्या या ट्विटनंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या तर काही वापरकर्ते नाराजी व्यक्त करत होते. काहींनी तर त्याची टिंगल देखील केली.
Web Title: Virat Kohli facing depression problem because of Bollywood actress wife Anushka Sharma shocking statement sparks controversy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.