Join us  

Virat Kohli, Fake Fielding: विराटच्या नावाने बांगलादेशचं रडगाणं सुरूच, आता क्रिकेट बोर्डानेही केली टीका

भारताने बांगलादेशचा ५ धावांनी केला होता पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 10:35 AM

Open in App

Virat Kohli, Fake Fielding: भारताने T20 World Cup 2022 मध्ये चौथ्या सामन्यात बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. पावसामुळे अडसर झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. त्या पराभवानंतर बांगलादेशचे खेळाडू विराट कोहलीच्या नावाने सध्या रडगाणं गाताना दिसत आहेत. भारताकडून हरल्यानंतर बांगलादेशचा खेळाडू नुरुल हसनने पत्रकार परिषदेत कोहलीवर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे ऑपरेशन्स चेअरमन जलाल युनूस यांनी या प्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले जलाल युनूस

"पंचांनी कोहलीचा फेक फिल्डिंगचा प्रकार पाहिला होता, पण पंचांनी तो पाहिला नसल्याचे सांगितले. म्हणूनच त्यांनी रिव्ह्यू घेतला नाही. शकीब अल हसन सामन्यादरम्यान आणि नंतर अंपायर इरास्मसशीही बोलला, पण त्याचा पंचांनी विचार केला नाही. फेक फिल्डिंगचे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आम्ही याबद्दलची तक्रार योग्य ठिकाणी नक्कीच मांडू," असे विधान युनूस यांनी केले.

नक्की काय घडला होता प्रकार

बांगलादेशच्या डावाच्या सातव्या षटकात जेव्हा लिटन दासने अक्षर पटेलच्या चेंडूवर डीप ऑफ साइडमध्ये शॉट मारला. त्यावेळी चेंडू कोहलीकडे नसताना त्याने फेक फिल्डिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. हसनच्या मते, कोहलीने चेंडू फेकण्याचे नाटक केले. यासाठी ५ धावांची पेनल्टी लावता आली असती. असे झाले असते तर सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागू शकला असता, पण तसे घडू शकले नाही.

सामन्यात कोहलीची दमदार कामगिरी

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ४४ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच वेळी केएल राहुलने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने जबरदस्त सुरुवात करत ६८ धावांची भागीदारी केली. बांगलादेशची ७व्या षटकात धावसंख्या बिनबद ६६ होती. त्यानंतर पाऊस आला आणि षटके कमी करण्यात आली. बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य त्यांना मिळाले. बांगलादेशचा संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा सलामीची भागीदारी तुटली आणि त्यानंतर संपूर्ण सामनाच पालटला. बांगलादेशच्या संघाला १६ षटकांत केवळ १४५ धावा करता आल्या. लिटन दासने सर्वाधिक ६० धावा केल्या.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२विराट कोहलीबांगलादेशभारत
Open in App