नवी दिल्ली - विराट कोहली लवकर बाद झाला म्हणून पेटवून घेतेल्या चाहत्याचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावांमध्ये विराट कोहली अवघ्या पाच धावांवर बाद झाला होता. कोहलीची ही विकेट त्याच्या जिव्हारी लागली आणि त्यानं स्वत:ला पेटवून घेतलं होतं. या व्यक्तीचं नाव बाबूलाल बैरवा आहे. 63 वर्षीय बाबूलाल मध्य प्रदेशमधील रहवाशी आहेत. विराट कोहली बाद झाल्यानंतर त्यांनी निराश होऊन स्वतला पेटवून घेतलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूलाल घरी टीव्हीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कसोटी सामना पाहत होते. या सामन्यात कर्णधार विराट कोहली अवघ्या 5 धावांवर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर बाबूलाल यांनी स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. मात्र त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या अंगावर कपडे टाकून आग विझवली. आणि उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं होतं.
(आणखी वाचा : सनथ जयसूर्याची अवस्था वाईट, कुबड्यांशिवाय येत नाही चालता )
विराटचा जबरा फॅन मानणाऱ्या एका चाहत्यानं विराट कोहलीला पाहण्यासाठी आपल्या आईचे दागीने विकल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्याचे नाव निकाश असून तो ओडिसाचा आहे. निकाश आतापर्यंत चार वेळा कोहलीला भेटलाय. तो स्वत:ला विराटचा मोठा चाहता मानतो. यासाठी त्याने आपले कामही सोडून दिलेय.
( आणखी वाचा : पहिल्या कसोटीपूर्वीच द. आफ्रिकेनं केला भारताचा अपमान, तुम्हालाही येईल राग )
दरम्यान, टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतू भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.