Join us  

Virat Kohli: कोहलीनं इतिहास रचला! IPL मध्ये एकाच संघाकडून २०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला

IPL 2021, RCB, Virat Kohli: इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) नवा विक्रम रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 8:55 PM

Open in App

IPL 2021, RCB, Virat Kohli: इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) नवा विक्रम रचला आहे. विराट कोहली आज आयपीएलमधला २०० वा सामना खेळत आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाकडून २०० सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

तीन दिवसांत दोन मोठे निर्णय!; विराट कोहलीच्या निर्णयामागे नेमकं दडलंय काय?

आयपीएलमध्ये आजवर २०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचवा खेळाडू ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनीही आयपीएलमध्ये दोनशे सामने खेळण्याचा पल्ला ओलांडला आहे. पण एकाच संघाकडून २०० सामने खेळण्याचा पराक्रम करणारा कोहली पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहली २००८ सालापासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळत आहे. 

एमएस धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत २१२ सामने खेळले आहेत. रोहित शर्मा २०७, दिनेश कार्तिक २०३, तर सुरेश रैना २०१  सामने खेळला आहे. आता या यादीत कोहलीचाही समावेश झाला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App