Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

विराटने केवळ १ धाव केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 12:59 PM2022-07-10T12:59:19+5:302022-07-10T13:00:08+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Flop Show with Bat but impresses fans with dance skills on ground while fielding viral video ind vs eng 2nd t20 | Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Dance Viral Video, India vs England 2nd T20: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवली. भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा सुरुवातीच्या षटकांत इंग्लंडला हादरवले. भुवीच्या दमदार कामगिरीनंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) व युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. २०१४ नंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका हरलेला नाही. तोच विजयी प्रवाह रोहित शर्मानेही सुरू ठेवला. या सामन्यात विराट कोहलीला दीपक हुड्डाच्या जागी संधी मिळाली होती, पण कोहलीने केवळ १ धाव केली. असे असले तरी त्याच्या डान्सने मात्र चाहत्यांची मनं जिंकली.

विराट कोहली गेल्या दोन-तीन वर्षांपासून फॉर्मशी झगडतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला २०१९ नंतर एकही शतक ठोकता आलेले नाही. इतकेच नव्हे तर गेल्या काही महिन्यात त्याला अर्धशतकही गाठताना प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत. पहिल्या टी२० सामन्यात विराटने विश्रांती घेतली होती. त्यावेळी दीपक हुड्डाने सामना गाजवला. पण विराटचा अनुभव पाहता त्याला दुसऱ्या टी२० मध्ये संधी मिळाली. असे असताना विराटने ३ चेंडूत केवळ १ धाव केली आणि तो झेलबाद झाला. त्यामुळे चाहते निराश झाले. पण त्यानंतर फिल्डिंग करताना विराटने केलेल्या डान्स स्टेप्समुळे चाहत्यांचे थोड्या प्रमाणात मनोरंजन झाले. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी ४९ धावांची भागीदारी केली. पण, बिनबाद ४९ वरून भारताचे पाच फलंदाज ८९ धावांत तंबूत परतले. रोहित (३१), विराट कोहली (१), रिषभ (२६), सूर्यकुमार यादव (१५)  व हार्दिक पांड्या (१२) माघारी परतले. रवींद्र जाडेजा (४६) व दिनेश कार्तिक यांनी टीम इंडियाचा डाव सावरत ८ बाद १७० धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला बाद केले. तेव्हापासून सामना भारताकडेच झुकला. भुवनेश्वरने ३ बाद १५ अशी कामगिरी केली. जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल दोघांनीही प्रत्येकी २ बाद १० अशी कामगिरी करत संघाच्या विजयात हातभार लावला.

Web Title: Virat Kohli Flop Show with Bat but impresses fans with dance skills on ground while fielding viral video ind vs eng 2nd t20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.