Join us  

Virat Kohli : कर्णधारपद सोडताच विराट कोहलीचे ग्रह फिरले; सात वर्षांत जे घडले नव्हते ते त्याच्यासोबत घडले!

विराट कोहलीनं मागील आठवड्यात कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले. ट्वेंटी-२० व वन डे नंतर विराटचे कसोटीचेच नेतृत्व होते, परंतु त्या जबाबदारीतूनही मुक्त होण्याचा निर्णय त्यानं घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 4:27 PM

Open in App

विराट कोहलीनं मागील आठवड्यात कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले. ट्वेंटी-२० व वन डे नंतर विराटचे कसोटीचेच नेतृत्व होते, परंतु त्या जबाबदारीतूनही मुक्त होण्याचा निर्णय त्यानं घेतला. ७ वर्षांच्या या कर्णधारपदाच्या प्रवासात भारतीय संघाला त्यानं आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावरून थेट अव्वल क्रमांकावर आणून बसवलं. पण, त्यानं कर्णधारपद सोडलं अन् ताज्या क्रमवारीत टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मागील पाच महिन्यांत विराटनं त्याच्या चाहत्यांना धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद, त्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद त्याने सोडले. त्यानंतर वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले. आता एकाही फॉरमॅटचे कर्णधारपद नसणाऱ्या विराट कोहलीवर ( Virat Kohli) मोठी नामुष्की ओढावली आहे. २०१५ नंतर प्रथमच विराटवर ही वेळ आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कर्णधार म्हणून विराटनं २१३ पैकी १३५ सामने जिंकले आहेत. त्यात त्यानं ५९.९२च्या सरासरीनं १२,८८३ धावा केल्या आहेत आणि त्यात ४१ शतकांचा समावेश आहे. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून त्याचा फलंदाजीतील विक्रम पाहता. त्यानं ११३ डावांमध्ये ५४.८०च्या सरासरीनं ५८६४ धावा केल्या आहेत आणि त्यात २० शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळलेल्या ११ पैकी ११ कसोटी मालिका भारतानं जिंकल्या आहेत. त्याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज येथे कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट अव्वल स्थानी आहे. त्यानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले आहेत.

पण, आयसीसीनं दोन दिवसांत जाहीर केलेल्या २०२१मधील सर्वोत्तम वन डे, ट्वेंटी-२० व कसोटी संघापैकी एकातही विराटला स्थान मिळालेले नाही. २०१५ नंतर प्रथमच विराट आयसीसीच्या वर्षातील कोणत्याच संघाचा सदस्य नाही. शिवाय वन डे व ट्वेंटी-२० संघात एकही भारतीय खेळाडू नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. विराटनं आयसीसीच्या वन डे संघाचे  चार वेळा ( २०१६, २०१७, २०१८ व २०१९) नेतृत्व सांभाळले आहे.  

आयसीसीच्या २०२१ वर्षांतील संघांची यादी 

आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात एकही भारतीय नाही; बाबर आजमला बनवले कर्णधार

भारतीय खेळाडूंवर प्रथमच ओढावली नामुष्की; आयसीसीच्या वन डे व ट्वेंटी-२० संघात मिळालं नाही स्थान!

ICC Men's Test team of year 2021मध्ये रोहित शर्मासह तीन भारतीयांनी पटकावले स्थान; केन विलिम्सनकडे संघाचे नेतृत्व

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी
Open in App