भारतीय संघाला पहिल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. दुसरा डाव ३६ धावांवरच गडगडल्यानं टीम इंडियाला यजमानांसमोर ९० धावांचेच लक्ष्य ठेवता आले. मॅथ्यू वेड व जो बर्न यांनी ते सहज पार केले आणि ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) ७४ धावांची खेळी केली. त्याचा फायदा पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेण्यास झाला, परंतु दुसऱ्या डावातील हाराकिरीमुळे भारताला सामना गमवावा लागला. पण, विराटचे हे अर्धशतक पूर्णपणे वाया गेलं नाही. ICCनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत त्याचा फायदा झाला. ICC Test Player Rankings for batting
पहिल्या कसोटीतील अर्धशतकामुळे विराटनं खात्यात दोन गुणांची भर घातली आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या स्टीव्हन स्मिथ आणि दुसऱ्या क्रमांकातील अंतर कमी केलं. स्मिथ ९०१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर विराटच्या खात्यात आता ८८८ गुण आहेत. चेतेश्वर पुजाराची ८व्या स्थानी घसरण झाली आहे. या दोघांसह टॉप टेनमध्ये एकही भारतीय फलंदाज नाही.