लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स (RCB) यांच्यातील सामन्याला ७ दिवस उलटले आहेत. मात्र आजही विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील शाब्दिक युद्ध कोणीही विसरू शकलेले नाही. विराट आणि गंभीर यांच्यातील हा वाद लखनौच्या एकना स्टेडियमवर झाला. विराट आणि नवीनमध्ये आधी भांडण झाले आणि त्यानंतर गंभीर व विराट एकमेकांना भिडले. गंभीर हा लखनौचा मार्गदर्शक आहे तर विराट हा आरसीबीचा माजी कर्णधार आहे. पण या प्रकरणाची खरी सुरुवात बंगळुरूपासून झाली.
WTC Final मध्ये संधी न मिळाल्याने वृद्धीमान साहा नाराज? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, विराट आणि गंभीर यांच्यातील लढत पाहून लखनौच्या खेळाडूंना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. कारण यापूर्वी जेव्हा बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडले होते, तेव्हा विराट, गंभीर आणि विजय दहिया यांच्यात सुमारे ४५ मिनिटे संभाषण झाले होते. अशा स्थितीत संपूर्ण वाद संपल्यानंतरही विराट आणि गंभीर लखनौमध्ये एकमेकांना भिडले.
लखनौमध्ये नवीन-उल-हकशी भांडण झाल्यामुळे गंभीरला कोहलीवर राग आला होता. नवीन बाद झाल्यानंतर विराट त्याला क्रीज सोडण्यास सांगत होता. यादरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात वादावादीही झाली. मग काइल मेयर्स विराटशी बोलत असताना गंभीरने येऊन त्याला बाजूला केले. या सामन्यात बंगळुरू संघाने १८ धावांनी विजय मिळवला होता. आणि त्याच सामन्यात लखनौने केएल राहुलला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती आणि तो आता संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याआधी लखनौने बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते.
LSG vs RCB सामन्यानंतर नेमकं काय घडलं?
- कायले मायर्स विराटसोबत गप्पा मारताना गंभीर तेथे आला अन् LSGच्या फलंदाजाला घेऊन गेला.
- त्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करत असताना वादाची पहिली ठिणगी पडली
- LSGचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले
- विराटने तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले अन् हे पाहून नवीन अंगावर धावला, परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले
- हा वाद पाहताच गौतम गंभीर पुन्हा आक्रमक पवित्र्यात गेला अन् दूरूनच विराटवर खवळला
- लोकेश राहुलसह लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विराटपर्यंत पोहोचला
- त्यानंतरही विराट शांततेने त्याच्याशी बोलताना दिसला, परंतु गंभीरचा पारा चढाच होता.
- पण खरं भांडण जेव्हा नवीन बाद होऊन माघारी जात होता तेव्हाच सुरू झालं होतं.. विराट त्याला काहीतरी म्हणाला होता
Web Title: Virat Kohli, Gautam Gambhir Had 45-Minute Chat in Bengaluru; LSG Players Shocked With Fight in Lucknow: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.