Virat Kohli: कोहलीचं चाहत्यांना 'विराट' चॅलेंज, 10 पैकी ओरीजनल ओळखून दाखवा

एकाच कपड्यात असलेले विराट कोहलीचे 10 छायाचित्र विराटने शेअर केले आहेत. चाय पे चर्चा करतानाचे हे 10 जण वेगवेगळ्या पोझमध्ये दिसून येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 10:03 AM2022-02-21T10:03:28+5:302022-02-21T10:11:08+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli: Get to know the origin of Kohli's huge challenge, 10 out of 10 by twitter | Virat Kohli: कोहलीचं चाहत्यांना 'विराट' चॅलेंज, 10 पैकी ओरीजनल ओळखून दाखवा

Virat Kohli: कोहलीचं चाहत्यांना 'विराट' चॅलेंज, 10 पैकी ओरीजनल ओळखून दाखवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी अनेकदा काही खास क्षण, छायाचित्र शेअर करतात. त्यामध्ये, राजकारणी असोत, बॉलिवूड कलाकार असोत किंवा दिग्गज क्रिकेटर्स असोत, चाहत्यांनाही आपल्या लाडक्या सेलिब्रेटींशी संवाद साधायला, कमेंट करायला आवडतं. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीनेट्विटरवरुन चाहत्यांना एक टास्क दिला आहे. या टास्कमध्ये एक फोटो शेअर करत विराटने चाहत्याने चॅलेंज केलं आहे. 

एकाच कपड्यात असलेले विराट कोहलीचे 10 छायाचित्र विराटने शेअर केले आहेत. चाय पे चर्चा करतानाचे हे 10 जण वेगवेगळ्या पोझमध्ये दिसून येत आहेत. एकच सुट, दाढीचा सेम कोरीव आकार आणि स्टाईलमुळे हे सर्वच सेम टू सेम दिसून येतात. त्यात एक फोटो वेगळा असून तोच फोटो ओळखण्याचे काम विराटने चाहत्यांना दिले आहे. विराटच्या या ट्विटला आत्तापर्यंत 1 लाख 71 हजार लाईक्स असून 9,802 जणांनी हे ट्विट रिट्वीट केलं आहे. 

विराटचे चाहते या 10 पैकी जो फोटो ओरिजनल विराटचा वाटतो, तो क्रॉप करुन कमेंटमध्ये टाकत आहेत. तर, काहीजण यातील दोन फोटोवरुन मोहम्मद सिराज आणि आझम बाबर या दोघांना ट्रोल करत आहेत. विराटने इंस्टाग्रामवरही हा फोटो शेअर करत चाहत्यांना टास्क दिला आहे. त्यावरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत. विराटच्या चाहत्यांना विराट हा विराटच असतो, एकच विराट होऊ शकतो, असे म्हटले आहे. तसेच, कुणीही कॉपी केली तर ओरीजनल तो विराट असाही रिप्लाय काहींनी दिला आहे. 


दरम्यान, विराट कोहलीने टी-20 विश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, वनडे टीमचे कर्णधारपदी विराटला सोडावे लागले. तर, दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधार पदाचाही राजीनामा दिला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरला होता.  
 

 

 

Web Title: Virat Kohli: Get to know the origin of Kohli's huge challenge, 10 out of 10 by twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.