VIDEO : लय भारी! कॅरेबियन खेळाडूच्या आईची 'स्वप्नपूर्ती', किंग कोहलीची भेट अन् आनंदाश्रू

Virat Kohli Gets Mother’s Love : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 01:04 PM2023-07-22T13:04:08+5:302023-07-22T13:04:31+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Gets Mother's Love ind vs wi match Joshua Da Silva's mother hugged and kissed Virat Kohli, watch video here | VIDEO : लय भारी! कॅरेबियन खेळाडूच्या आईची 'स्वप्नपूर्ती', किंग कोहलीची भेट अन् आनंदाश्रू

VIDEO : लय भारी! कॅरेबियन खेळाडूच्या आईची 'स्वप्नपूर्ती', किंग कोहलीची भेट अन् आनंदाश्रू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI 2023 | नवी दिल्ली : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. गुरूवारपासून मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यातील आपल्या पहिल्या डावात भारतीय संघाने ४३८ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीच्या (१२१) शतकी खेळीने सामन्यात रंगत आणली. टीम इंडियाने सांघिक खेळी करत १२८ षटकांत सर्वबाद ४३८ धावा केल्या आहेत. खरं तर वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक जोशुआ दा सिल्वाची आई देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली आहे. मात्र, कॅरेबियन खेळाडूच्या आईने किंग कोहलीची झलक पाहण्यासाठी मैदानात उपस्थिती लावली होती. याचा खुलासा खुद्द जोशुआ दा सिल्वाने केला आहे. 

जोशुआ दा सिल्वाने सांगितले की, त्याची आई 'कॅरोलिन' ही विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे आणि दुसऱ्या कसोटीमध्ये आपल्या मुलाला बघण्याऐवजी ती किंग कोहलीला भेटायला आली होती. विराट कोहलीला भेटायचे हे कॅरेबियन खेळाडूच्या आईचे स्वप्न होते. मग विराटने देखील त्या माऊलीचे स्वप्न पूर्ण केले.

जोशुआ दा सिल्वाच्या आईचे स्वप्न विराटकडून पूर्ण 
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटची आपल्या या फॅनसोबत भेट झाली. कॅरेबियन खेळाडूची आई विराटची झलक पाहण्यासाठी मैदानाबाहेर उभी होती. आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्याची आणि भेटण्याची संधी मिळाल्याने जोशुआ दा सिल्वाच्या आईचे स्वप्न अखेर साकार झाले. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सिल्वाच्या आईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीची भेट घेतली अन् ती भावुक झाली. 

दरम्यान, जोशुआ दा सिल्वाच्या आईने विराटला मिठी मारली. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा भारतीय खेळाडू खेळ संपल्यानंतर बसने हॉटेलमध्ये परतत होते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विराटला मिठी मारल्यानंतर जोशुआ दा सिल्वाची आई भावुक झाली अन् तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. कॅरेबियन खेळाडूच्या आईने विराट कोहलीला एकदा नव्हे तर दोनदा मिठी मारली.

Web Title: Virat Kohli Gets Mother's Love ind vs wi match Joshua Da Silva's mother hugged and kissed Virat Kohli, watch video here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.