विराट कोहलीने १००व्या कसोटी सामन्यात विजय मिळवून एका वेगळ्या पंक्तित स्थान पटकावले. अनिल कुंबळे, व्ही व्ही एस लक्ष्मण, हरभजन सिंग, इशांत शर्मा यांच्यानंतर १००व्या कसोटीत विजय मिळवणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी १ डाव व २२२ धावांनी जिंकली. रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला. भारताच्या ८ बाद ५७४ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात १७४ आणि दुसऱ्या डावात १७८ धावाच केल्या. नाबाद १७५ धावां आणि दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेणाऱ्या जडेजाला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. या सामन्यात विराटने चांगली फटकेबाजी केली, परंतु त्याला ४५ धावांवर माघारी परतावे लागले.
विराटने १०० कसोटींत ५०.३५च्या सरासरीने ८००७ धावा केल्या आहेत आणि त्यात २७ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून कसोटीत ८००० धावा करणारा तो सहवा फलंदाज ठरला. त्याने १६९ डावांमध्ये हा विक्रम केला. सचिन तेंडुलकर ( १५४ डाव), राहुल द्रविड ( १५८), वीरेंद्र सेहवाग ( १६०) व सुनील गावस्कर ( १६६ ) यांनी विराटपेक्षा कमी धावांत कसोटीत ८००० धावा केल्या आहेत. सामन्यानंतर विराट जेव्हा भारतीय संघाच्या बसमध्ये चढत होता तितक्यात धरमवीरपाल ( Dharmveerpal) या टीम इंडियाच्या अनऑफिशीय १२व्या खेळाडूने विराटला हाक मारली. त्यानंतर विराट त्याच्या फॅनला भेटायला आला आणि स्वतःची जर्सी त्याला भेट म्हणून दिली.
पाहा व्हिडीओ..