Join us  

विराट कोहलीने सर्वांसमोर दिलं अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट, म्हणाला...

यावेळी कोहलीने सर्वांसमोर अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:38 PM

Open in App

मुंबई : भारताने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने झंझावाती अर्धशतक साजरे केले होते. या दिवशी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या सामन्यानंतर सर्वांसमोर विराटने अनुष्काला एक खास गिफ्ट दिले.

सामना संपल्यावर पारितोषिक वितरण सोहळा पार पाडला. यावेळी कोहलीला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला. यावेळी कोहलीने सर्वांसमोर अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट दिले.

या सामन्यात कोहलीने धडाकेबाज नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. ही कोहलीची सर्वात जलद खेळी ठरली. आपली हीच खेळी विराटने अनुष्काला भेट दिली. सामनानंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीने ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामना २४० धावा उभारल्या. यामध्ये रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्यासह विराट कोहलीचाही महत्वाचा वाटा होता. कोहली आणि अनुष्का यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे भारताचा डाव संपल्यावर कोहलीने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना एक खास गिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले.

भारताचा डाव संपवून कोहली हा पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी कोहलीने हे गिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने पॅव्हेलियनमध्ये जाता बॅट उंचावली. त्यानंतर कोहलीने फ्लाइंग किस दिल्याचेही पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.

 

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी खिशात टाकली. भारताने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २४१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा वेस्ट इंडिजला यशस्वी पाठलाग करता आला नाही आणि त्यांना सामन्यासह मालिका गमवावी लागली. भारताने हा सामना ६७ धावांनी जिंकला.

 

फलंदाजीला येण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला सलामीवीर इव्हिन लुईसच्या रुपात मोठा धक्का बसला होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे लुईसला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. त्यामुळे या सामन्यात त्यांना चांगली सलामी मिळू शकली नाही. शिमरोन हेटमायरने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ४१ धावांवर समाधान मानावे लागले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण फटकेबाजी करण्याचा नादात पोलार्डने आपला बळी गमावला आणि वेस्ट इंडिजच्या हातून सामना निसटला. पोलार्डने ३९ चेंडूंत ६८ धावा केल्या.

मुंबई : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी वानखेडेवरच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या दणदणीत खेळींच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिजपुढे 241 धावांचे आव्हान ठेवता आले. लोकेश राहुलने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ९१ धावांची खेळी साकारली. रोहितने त्याला ७१ धावांची झंझावाती खेळा साकारून चांगली साथ दिली, तर कोहलीनेही यावेळी धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहितने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही रोहित आक्रमक फटकेबाजी करत होता. दुसरीकडे राहुलही गोलंदाजीवर तुटून पडत होता. रोहितनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. रोहितने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

रोहित बाद झाल्यावर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. पण पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पंतनंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून ठेवला. या दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर प्रहार करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. isher

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा