Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलसाठी विराट बनला ‘कोच कोहली’, Video पाहताच भारतीय फॅन्स खुश

विराटच्या टिप्सचा राहुलला किती फायदा होईल, तुम्हाला काय वाटते?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 08:28 PM2022-11-01T20:28:40+5:302022-11-01T20:29:07+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli giving batting tips to KL Rahul during Team India practice session ahead of IND vs BAN T20 World Cup 2022 match | Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलसाठी विराट बनला ‘कोच कोहली’, Video पाहताच भारतीय फॅन्स खुश

Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलसाठी विराट बनला ‘कोच कोहली’, Video पाहताच भारतीय फॅन्स खुश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: भारत आणि बांगलादेशचे संघ बुधवारी T20 विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण सामन्यात आमनेसामने येणार आहेत. रोहित शर्माच्या संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. बांगलादेशला हरवून भारतीय संघाला स्पर्धेत पुढे जाता येईल. अशा स्थितीत भारतीय संघ कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. एडिलेडच्या मैदानावर उतरण्यापूर्वी भारतीय संघ सराव सत्रात घाम गाळताना दिसला. या दरम्यान, सराव सत्रात विराट कोहली सलामीवीर केएल राहुलला फलंदाजीच्या काही टिप्स देताना दिसला. त्याचा व्हिडीओ पाहताच भारतीय चाहत्यांना प्रचंड आनंद झाल्याचे दिसून आले.

खरे पाहता केएल राहुल खराब फॉर्मशी झुंजत आहे. या स्पर्धेत त्याने ३ सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्याला दुहेरी आकडाही पार करता आला नाही. पाकिस्तानविरुद्ध ४ तर नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ९-९ धावा केल्या. केएल राहुल भारताला दमदार सुरुवात करून देऊ शकला नाही, तर त्याचा संघालाही फटका बसताना दिसत आहे. त्यामुळेच त्याच्यावर जोरदार टीकाही होत आहे. या कठीण काळात कोहली त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि सराव सत्रात त्याला फॉर्ममध्ये परतण्यासाठी टिप्स देताना दिसला. राहुलची ही अवस्था कोहलीपेक्षा चांगली कोणीही समजू शकत नाही. कोहली स्वतःही या टप्प्यातून गेला आहे आणि या परिस्थितीत मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे किती महत्त्वाचे आहे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

--

--

--

विराट कोहली स्वत: जवळपास ३ वर्षे खराब फॉर्मशी झुंज देत होता आणि नुकताच तो फॉर्ममध्ये परतला. आता वर्ल्डकपमध्ये त्याच्या बॅटने दमदार खेळी केली. कोहलीला एके काळी निवृत्तीपर्यंतचे सल्ले मिळू लागले होते, पण तो सतत मेहनत करत राहिला. त्याने उणिवांवर काम केले आणि गमावलेली लय परत मिळवली. त्याने एकट्याच्या जोरावर भारताला पाकिस्तानवर विजय मिळवून दिला.

Web Title: Virat Kohli giving batting tips to KL Rahul during Team India practice session ahead of IND vs BAN T20 World Cup 2022 match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.