Join us  

विराट निघाला वेस्ट इंडिज जिंकायला; पाहा त्याच्या बाजूला बसलंय तरी कोण...

ही व्यक्तीही व्यक्ती नेमकी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 9:03 PM

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकायला निघाला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्याला जाण्यासाठी कोहली निघाला असून त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली आहे. ही व्यक्ती नेमकी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल...

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं आपला संघ आधीच जाहीर केला. वेस्ट इंडिजनं सॉलिड संघ मैदानावर उतरवला.

कोहली विमानाने हैदराबादला निघाला आहे. यावेळी विमानात त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली होती. ही व्यक्ती कोण, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर विराटच्या बाजूला यावेळी संघातील लोकेश राहुल आणि त्याच्या बाजूला शिवम दुबे हे बसले आहेत. विराटने याबाबतचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

वेस्ट इंडिजचा संघ सरावाला लागला; भारताचे खेळाडू करतायत तरी काय...भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाने सराव करायला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजचा संघ या मालिकेकडे गंभीरपणे पाहतो आहे. पण दुसरीकडे भारताचे खेळाडू करतायत तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघाची घोषणा केली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजनं हा संघ जाहीर केला आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी किरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पोलार्डसह ट्वेंटी-20 संघात शेरफन रुथरफोर्ड आमि जेसन होल्डर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

पाहुण्यांनी दमदार फलंदाजांची फौजच या मालिकेला पाठवली आहे. यात एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, लेंडल सिमन्स, पोलार्ड आणि निकोलस पूरण यांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे शेल्डन कोट्रेल, होल्डर, किमो पॉल आणि केस्रीक विलियम्स यांचा समावेश आहे. 

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक  

टॅग्स :विराट कोहलीलोकेश राहुलभारत विरुद्ध वेस्ट इंडिज