Join us  

Virat Kohli U19 Indian Team Zoom Call: आता टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप! विराटने फायनलआधी झूम कॉलवरून भारताच्या 'यंग ब्रिगेड'ला केलं मार्गदर्शन

स्पर्धा सुरू होण्याआधी रोहित शर्मानेही केलं होतं मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 9:31 AM

Open in App

Virat Kohli U19 Indian Team Zoom Call: १९ वर्षाखालील भारतीय संघाने यंदाच्या U19 World Cup मध्ये फायनलमध्ये धडक मारली. कर्णधार यश धूलच्या शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. आता भारतीय संघाचा अंतिम सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ खास तयारी करत आहेच. पण त्यासोबतच भारताच्या यंग ब्रिगेडला फायनलआधी थेट विराट गुरूजींचं मार्गदर्शन लाभलं. विराट कोहलीने १९ वर्षाखालील भारतीय संघातील काही खेळाडूंशी झूम कॉलवरून संवाद साधला. भारताला दमदार विजय मिळवून देणारा कर्णधार यश धूल, राज्यवर्धन हर्गेगेकर आणि कौशल तांबे या तिघांशी विराटने झूम कॉलवरून गप्पा मारल्या आणि फायनलआधी महत्त्वाच्या टिप्स देत मार्गदर्शन केलं. तसंच, फायनलपर्यंत पोहोचण्यात यश मिळाल्याने अभिनंदन केलं.

"विराट भैय्या, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे क्रिकेटमधील आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला भविष्यात खेळ सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल", असं राज्यवर्धनने लिहिलं. तर "एका महान खेळाडूकडून फायनलआधी काही खास टिप्स", असं म्हणत कौशल तांबे याने फोटो पोस्ट केला. विराटच्या नेतृत्वाखाली २००८ साली क्वालालंपूर येथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने १९ वर्षाखालील स्पर्धेत विश्वचषक जिंकला होता. तशीच किमया आता यश धूलच्या संघाला इंग्लंडविरूद्ध करून दाखवावी लागणार आहे.

स्पर्धेआधी रोहित शर्मानेही केलं होतं मार्गदर्शन

U19 World Cup सुरू होण्याआधी नॅशनल क्रिकेट अँकडमीमध्ये रोहित शर्माने युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर भारताने दमदार कामगिरी करत फायनलपर्यंत धडक मारली. तशातच आता रोहितनंतर विराटनेही युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे आता तर भारतीय खेळाडू आणखी जोर लावून खेळतील आणि विश्वचषक जिंकतील अशी अपेक्षा सारेच व्यक्त करत आहेत.

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App