Join us  

virat kohli instagram income:मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ

विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:29 AM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे. रनमशीन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला किंग कोहली मागील जवळपास ३ वर्षांपासून आपल्या वैयक्तिक शतकीय खेळीपासून वंचित राहिला आहे. विराटच्या खराब फॉर्ममुळे अनेकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली असून त्याला विश्रांती देण्याची मागणी केली आहे. मात्र दिग्गजांनी कोहलीवर टीका केल्यानंतर देखील विराट सोशल मीडियावर सुसाट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोहली इंस्टाग्रामवरील एका स्पॉन्सर पोस्टसाठी सुमारे ८.७० लाख रूपये घेत आहे आणि यासोबतच तो एका पोस्टमधून सर्वाधिक रक्कम घेणारा आशियातील सेलिब्रिटी बनला आहे. 

१४ व्या स्थानावर मारली मजलदरम्यान, अलीकडेच hopperhq ने २०२२ मधील इंस्टाग्रामची रिच लिस्ट जारी केली आहे. या ताज्या यादीमध्ये किंग कोहलीने मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी कोहली एक इंस्टाग्राम पोस्टसाठी ५ कोटी रूपये घेत होता आणि तो १८ व्या स्थानावर होता. मात्र २०२२ च्या ताज्या यादीमध्ये त्याने ४ पाऊलांनी मोठी झेप घेत १४ व्या स्थानावर मजल मारली आहे. क्रिकेट विश्वाबद्दल भाष्य करायचे झाले तर, या यादीत कोहलीचा नंबर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी नंतर येतो. लक्षणीय बाब म्हणजे रोनाल्डो एका पोस्टसाठी १९.७१ कोटी रूपये आकारतो, तर मेस्सी एका पोस्टसाठी १४.२१ कोटी घेतो.

hopperhq द्वारे जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतीयांमध्येविराट कोहलीनंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नंबर लागतो. प्रियंका एका पोस्टसाठी ३.३८ कोटी रूपये घेते आणि ती या यादीमध्ये २७ व्या क्रमांकावर आहे. 

२० कोटींहून अधिक कोहलीचे फॉलोअर्स विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या २० कोटींहून अधिक आहे. लक्षणीय बाब म्हणजे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा कोहली जगातील पहिल्या क्रमाकांचा क्रिकेटर आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत रोनाल्डो अव्वल स्थानी आहे, त्याचे एकूण ४६.९ कोटी फॉलोअर्स आहेत. तर ३५.१ कोटी फॉलोअर्ससह मेस्सी दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीइन्स्टाग्रामसेलिब्रिटीख्रिस्तियानो रोनाल्डोभारतप्रियंका चोप्रा
Open in App