Join us  

Shoaib Akhtar on Virat Kohli : विराट कोहली हा भारत व RCB या दोन्ही संघांसाठी अत्यंत दुर्दैवी कर्णधार - शोएब अख्तर

Shoaib Akhtar on Virat Kohli : विराट कोहलीने टीम इंडिया पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचेही कर्णधारपद सोडले. आता तो फक्त एक फलंदाज म्हणून दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 6:21 PM

Open in App

Shoaib Akhtar on Virat Kohli : विराट कोहलीने टीम इंडिया पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचेही कर्णधारपद सोडले. आता तो फक्त एक फलंदाज म्हणून दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व करत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) RCB संघाचे नेतृत्व आता फॅफ ड्यू प्लेसिसच्या ( Faf du Plessis) खांद्यावर सोपवण्यात आले आहे आणि त्याने आतापर्यंत दोनपैकी एक सामन्यात विजय मिळवला आहे.  पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा मात्र फॅफच्या नेतृत्वकौशल्यावर फार प्रभावित झालेला नाही. स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत त्याने फॅफचा मी मोठा फॅन नसल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला,''विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि फॅफ ड्यू प्लेसिसकडे ते सोपवले गेले. तो त्याच्या मार्गाने संघाचे नेतृत्व करतोय. मला त्यात काही कर्णधारपदाचे खास गुण दिसलेले नाही, त्यामुळे मी काही त्याचा फॅन होऊ शकत नाही.'' 

''विराट कोहली हा भारत आणि RCB या दोन्ही संघांसाठी दुर्दैवी कर्णधार आहे. त्याने त्याच्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने संघाला मदत झाली नाही. फॅफला आता स्वतःला सिद्ध करायचे आहे. फॅफकडे फार मोठ्या फ्रँचायझीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली आहे,''असेही अख्तर म्हणाला.  

फॅफ ड्यू प्लेसिसने आधी चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधीत्व केले आहे आणि तो आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरला आहे. ''तो बरीच वर्ष चेन्नईसाठी खेळला आणि नेतृत्व कसं करावं, याचे पाठ तो तिथे शिकला आहे. तरीही फॅफ किती यशस्वी होईल, याबाबत मला खात्री नाही. जर तो यशस्वी झाला, तर त्याला सलाम, परंतु मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे,'' हेही तो म्हणाला.

फॅफने आयपीएल २०२१त १६ सामन्यांत ४५.२१च्या सरासरीने  ६३३ धावा केल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदात त्याचाही महत्त्वाचा वाटा होता.  

टॅग्स :विराट कोहलीशोएब अख्तरएफ ड्यु प्लेसीस
Open in App