कोलकाता- दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या प्रत्येत सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीचं माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथने कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम विराट मोडू शकतो, असं गुंडप्पा विश्वनाथने म्हंटंल आहे. मास्टर ब्लास्टरचा 100 शकतांचा रेकॉर्ड तोडण्याची विराटकडे शानदार संधी आहे, असंही ते म्हणाले.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. विराटने एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत ३५ शतकं लगावली आहे. विराटच्या याच खेळीचं गुंडप्पा विश्वनाथने कौतुक केलं आहे. विराटने जबरदस्त कामगिरी केली आहे. खेळात सातत्य दाखविले आहे. एकामागे एक शतकं तो लगावतो. सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडण्याची त्याला मोठी संधी आहे. पण ते थोडं कठीण आहे, असं त्यांनी म्हंटलं.
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. सचिनही त्याच्या कामगिरीने खूश असेल. मात्र, त्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. विराट जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याचं सातत्य, धावांची भूक आणि आक्रमकपणा कमालीचा आहे, असं म्हणत गुंडप्पा विश्वनाथने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.