Virat Kohli episode Indian idol । नवी दिल्ली : भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टीव्हीच्या लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो इंडियन आयडॉलमधील गायक ऋषी सिंगचा चाहता झाला आहे. इस्टाग्रामवर विराट कोहलीला तब्बल 217 मिलियन लोक फॉलो करतात. मात्र किंग कोहली फक्त 258 लोकांना फॉलो करतो ज्यात ऋषी सिंगच्या देखील नावाचा समावेश आहे. खुद्द विराट कोहलीने ऋषी सिंगला वैयक्तिक मेसेज करून त्याचे अभिनंदन केले आहे. ज्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
इंडियन आयडॉलच्या शोचे होस्ट आदित्य नारायण यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, "ऋषीने आपल्या अभिनयाने संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत. यामध्ये अशी एक खास व्यक्ती आहे ज्याने ऋषीचा अभिनय पाहिला, ऐकला आणि वैयक्तिकरित्या मेसेज करून त्याचे कौतुकही केले. मला जास्त काही बोलायचे नाही, तुम्हीच हा मेसेज पाहा, असा मेसेज विराट कोहलीने ऋषीला पाठवला आहे."
विराट कोहलीने ऋषीला मेसेज लिहताना म्हटले, Hi ऋषी, कसा आहेस? मी काही वेळापूर्वीच तुझ्या व्हिडीओ पाहिल्या तू कमाल आहेस. मला तुझी सर्व गाणी आवडतात. ऑल द बेस्ट गॉड ब्लेस यू. याला उत्तर देताना ऋषीने विराट कोहलीचे आभार मानले. यानंतर विराटने आणखी एका मेसेजमध्ये लिहिले की, "खूप प्रगती कर, देव तुच्यासोबत आहे."
खरं तर ऋषी सिंग हा अयोध्याचा रहिवासी आहे. ऋषीचा जन्म होऊन फक्त 1 दिवस झाला असताना त्याची आई त्याला सोडून गेली. इंडियन आयडॉल शोदरम्यान आपल्या दत्तक पालकांबद्दल बोलताना ऋषी म्हणाला, "मी जर यांच्यासोबत नसतो तर कुठेतरी सडलो असतो, मरत असतो."
टी-20 विश्वचषकासाठी किंग कोहली सज्ज
विराट कोहलीने आशिया चषकाच्या स्पर्धेतून आपली जुनी लय पकडली आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकात त्याची विराट झलक पाहायला मिळणार का हे पाहण्याजोगे असेल. विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरूद्ध शतक झळकावले होते. किंग कोहलीने जवळपास 3 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. अशा स्थितीत मागील विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
Web Title: Virat Kohli has praised Indian Idol singer Rishi Singh by messaging him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.