virat kohli : "...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 08:49 PM2023-08-29T20:49:18+5:302023-08-29T20:49:38+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli has said that I like ODI cricket because it is challenging and one can learn a lot from it | virat kohli : "...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

virat kohli : "...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं", किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरूवात करेल. आशिया चषकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे खेळवला जाईल. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीनं विविध मुद्द्यांवर भाष्य केले असून, वन डे क्रिकेट आव्हानात्मक असल्याचं म्हटलं आहे. 

स्टार स्पोर्ट्सवरील 'फॉलो द ब्लूज' कार्यक्रमात बोलताना विराटनं सांगितलं की, मला वन डे क्रिकेट खेळायला आवडतं. माझ्या मते, वन डे क्रिकेट हे कदाचित एक असे स्वरूप आहे जे तुमच्या खेळाची पूर्ण 'टेस्ट' घेतं. इथं तुमचं तंत्र, संयम, टॅलेंट या सर्व गोष्टींची परीक्षा असते. येणाऱ्या परिस्थितीशी सामना करणं आणि खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळणं. हे या फॉरमॅटचं वैशिष्ट्यं आहे. त्यामुळं मला वाटतं की हा फॉरमॅट पूर्णपणे एक फलंदाज म्हणून तुमची परीक्षा घेते.

...म्हणून वन डे क्रिकेट आवडतं - विराट 
तसेच वन डे क्रिकेटनं माझ्याकडून नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करून घेतली आहे कारण मला ते आव्हान स्वीकारणे आणि माझ्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी परिस्थितीनुसार खेळणं आवडतं. मी नेहमीच असे करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून मी म्हटल्याप्रमाणे माझ्या फलंदाजीच्या सर्व पैलूंची नियमितपणे टेस्ट घेण्याची मला संधी मिळते आणि म्हणूनच मला वन डे क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळतो, असं विराटनं अधिक सांगितलं. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन) 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल                                                               

Web Title: Virat Kohli has said that I like ODI cricket because it is challenging and one can learn a lot from it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.