Virat Kohli: "...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा 

virat kohli on ms dhoni: भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने धोनीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 01:50 PM2023-02-26T13:50:51+5:302023-02-26T13:51:24+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli has said that MS Dhoni made me the vice-captain because I was learning everything from him  | Virat Kohli: "...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा 

Virat Kohli: "...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपदाच्या युक्त्या शिकल्या. आधी रेड बॉल क्रिकेट आणि नंतर मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोहलीने धोनीकडून कर्णधारपदाची कला शिकली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्टवरील चॅट दरम्यान, कोहलीने धोनीच्या हाताखाली खेळण्याबद्दल खुलासा केला आहे.

विराट कोहलीने म्हटले, "खरं तर अशी परिस्थिती होती की, मी त्याच्याकडून सर्वकाही शिकत होतो म्हणून एमएसने मला निवडले. जेव्हा आपल्याला समजते की 23 वर्षांचा असताना त्याने त्याच्या पंखाखाली उपकर्णधार म्हणून ठेवले, तेव्हा खूप छान वाटते. आपण काय करू शकतो याबद्दल मी त्याच्याशी नेहमी बोलायचो. मी त्याचा उजवा हात होतो. मी मॅच-विनिंग इनिंग खेळत होतो या गोष्टीची देखील खूप मदत झाली."

...म्हणून धोनीनं मला उपकर्णधार बनवलं
"धोनीला हे माहिती होते की मी हे समजले आहे की, खेळ कुठे चालला आहे आणि मला आता काय करायची गरज आहे. याशिवाय सामना सुरू असताना मी त्याला नेहमी माहिती देत राहायचो. मी कधीच खेळपट्टीवर उभा राहणारा नव्हतो", असे विराट कोहलीने आणखी सांगितले. 
 
जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीसोबत विराट कोहली जोडला आहे. तो 2011 मध्ये आरसीबीच्या संघाचा कर्णधार झाला. 2021 मध्ये विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराट कोहलीने 15 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 106 कसोटी, 271 वन डे आणि 115 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्याने अलीकडेच सचिन तेंडुलकरला मागे टाकून केवळ 549 डावात 25000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Virat Kohli has said that MS Dhoni made me the vice-captain because I was learning everything from him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.