ऑस्ट्रेलियात होतो कोहलीचा तिरस्कार

टीम पेन : विराटला प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना पाहणे मात्र अनेकांना आवडते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 04:58 AM2020-11-16T04:58:37+5:302020-11-16T04:58:50+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli is hated player in Australia | ऑस्ट्रेलियात होतो कोहलीचा तिरस्कार

ऑस्ट्रेलियात होतो कोहलीचा तिरस्कार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांमध्ये मतभिन्नता आहे. प्रतिस्पर्धी म्हणून स्थानिक लोक त्याचा तिरस्कार करतात. विराटला खेळताना पाहणे त्यांना पसंत नसले तरी ते विराटच्या खेळीचा आनंदही लुटणे पसंत करतात,असे मत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन याने रविवारी व्यक्त केले.

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार असून पहिला सामना ॲडिलेड येथे १७ डिसेंबरपासून खेळला जाईल. एबीसी स्पोर्ट्‌सशी बोलताना टीम पेन म्हणाला,‘मला विराटबाबत अनेक प्रश्न विचारले जातात मात्र माझ्यासाठी तो अन्य खेळाडूंसारखाच एक खेळाडू आहे. मला फारसा फरक पडत नाही. माझा त्याच्याशी कुठला परिचय देखील नाही. मी नाणेफेकीच्या वेळीच त्याला भेटतो. त्याच्याविरुद्ध खेळताना जितका संबंध येतो तितकाच माझा त्याच्याशी असलेला परिचय समजा.’
विराटबाबत मजेशीर बाब अशी की ऑस्ट्रेलियन म्हणून आम्ही त्याचा तिरस्कार करतो, त्याचवेळी प्रतिस्पर्धी फलंदाज या नात्याने तो आम्हाला मुळीेच पसंत नाही. पण त्याला खेळताना पाहणे आवडते. त्याच्याबाबत येथे वेगवेगळे विचार आहेत. त्याला अनेकजण फलंदाजी करताना पाहणे पसंत करतात, मात्र त्याने अधिक धावा काढू नये, अशीच सर्वांची भावना असते,’ असे पेनने स्पष्ट केले. 


मागच्या दौऱ्यात उभय संघ परस्परांपुढे उभे ठाकले त्यावेळी उभय कर्णधार एकमेकांना पाण्यात पाहण्याची संधी सोडत नव्हते. अनेकदा तर मैदानी पंचांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत केले. 


पंचांनी दोघांसोबतही वेगवेगळी चर्चा केली होती. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघांदरम्यान कडवी स्पर्धा आहे. मी आणि विराट प्रतिस्पर्धी आहोत. काही प्रसंगी आमच्यात वाद देखील झाले.तथापि विराट आणि मी कर्णधार आहोत म्हणून नव्हे तर दोन देशांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही एकमेकांवर वरचढ होण्याची एकही संधी गमावत, नाही. खेळपट्टीवर सर्वोत्कृष्ट खेळाडूंची उपस्थिती असेल त्यावेळी आव्हानात्मक सामना असतो,’ असे मत या यष्टिरक्षक-फलंदाजाने व्यक्त केले.
विराटसारखा चांगला खेळाडू मैदानावर असेल तर तणावपूर्ण स्थिती असणारच. आम्ही इंग्लंडविरुद्ध खेळतो त्यावेळी अशीच स्थिती असते. दिग्गज खेळाडूंविरुद्ध प्रतिस्पर्धी संघ अधिक आक्रमक होणार नसेल तर लढतीला रंग चढत नाही. मागच्या वर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने नमवले होते. याविषयी बोलताना पेन म्हणाला,‘प्रामाणिपणे बोलयाचे तर मी मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

अश्विनने केला गोलंदाजीचा सराव
n भारतीय संघ ७० दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी डेरेदाखल झाला असून कोरोनामुळे सर्व खेळाडू १४ दिवस विलगीकरणात आहेत. यादरम्यान खेळाडूंचा सराव मात्र सुरूच असून काल काही खेळाडूंनी जिम आणि मैदानावर सराव केला. 
n रविवारी रविचंद्रन अश्विन याने हाॅटेलबाहेर पाऊल ठेवले. त्याने थेट नेट्‌स गाठून फिरकी गोलंदाजीचा सराव केला. सोशल मीडियावर त्याने छायाचित्रे शेअर केली असून त्यात तो अजिंक्य रहाणे याला गोलंदाजी करताना दिसतो. हे दोन्ही खेळाडू कसोटी संघाचे सदस्य आहेत. 
 

Web Title: Virat Kohli is hated player in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.