Join us

Video: विराट कोहलीची ऑस्ट्रेलियन महिलेशी बाचाबाची, मेलबर्न एअरपोर्टवर झाला राडा, कारण काय?

Virat Kohli agrument with female Journalist, Video Viral: विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. जाणून घ्या, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:43 IST

Open in App

Virat Kohli agrument with female Journalist, Video Viral: विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया आता मेलबर्नला पोहोचली आहे आणि तिथे पोहोचताच विराट कोहली मोठ्या वादात सापडला. विराट कोहली मेलबर्नला पोहोचताच एका महिला पत्रकारासोबत त्याची बाचाबाची झाली. विराट कोहली विमानतळावर महिला रिपोर्टरशी बराच वेळ वाद घालताना दिसला. विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. जाणून घ्या, त्यामागचं कारण...

विराट कोहलीचा महिला पत्रकाराशी वाद

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिला पत्रकाराशी वाद घालताना दिसतो. विराट बोलत असताना खूप रागात दिसत आहे. यानंतर विराट कोहली ऑस्ट्रेलियन पत्रकारांना सांगतो की, तुम्ही लोक माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. पण चॅनल7 ने दावा केला आहे की, त्यांच्या मुलांचे कोणतेही फोटो क्लिक केलेले नाहीत किंवा त्यांचे व्हिडिओ बनवले गेले नाहीत. विराट कोहलीने सर्वांना सांगितले की त्याला प्रायव्हसीची आवश्यकता आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही त्याच्या मुलांचा व्हिडिओ बनवू शकत नाही.

दरम्यान, विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो पत्रकारांशी झालेल्या वादाचा मुद्दा संपूर्ण ऑस्ट्रेलियात गाजला. ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीवर टीका करत आहे. विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडिया यांचं नातं आधीपासूनच वेगळं आहे. त्यामुळे विराट या गोष्टीमुळे फारसा विचलित होणार नाही, असे बोलले जात आहे.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीआॅस्ट्रेलियापत्रकारभारतीय क्रिकेट संघ