विराट कोहली सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडणे अशक्य; महान खेळाडूने समजावली वस्तूस्थिती

सचिनचा १०० शतकांचा विक्रम विराटच मोडेल असे अनेकांचे म्हणणे आहे, परंतु एका दिग्गज खेळाडूंने या सर्वांसमोर वस्तुस्थिती मांडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:37 PM2023-12-07T16:37:39+5:302023-12-07T16:38:32+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli impossible to break Sachin's record of 100 centuries; Brian Lara | विराट कोहली सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडणे अशक्य; महान खेळाडूने समजावली वस्तूस्थिती

विराट कोहली सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडणे अशक्य; महान खेळाडूने समजावली वस्तूस्थिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीने ( Virat Kohli) विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने सचिन तेंडुलकरचा वन डेतील सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रम मोडला... विराटने वन डे क्रिकेटमध्ये शतकाचे अर्धशतक साजरे करून नवा विश्वविक्रम नावावर नोंदवला. आता विराटच्या चाहत्यांना ओढ लागली आहे ती सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतकांचा विक्रम तुटण्याची. २०१९ ते २०२२ या कालावधीत विराटच्या बॅटीतून धावांचा ओघ आटला होता, परंतु त्याने २०२३ मध्ये दमदार खेळ केला. सचिनचा १०० शतकांचा विक्रम विराटच मोडेल असे अनेकांचे म्हणणे आहे, परंतु एका दिग्गज खेळाडूंने या सर्वांसमोर वस्तुस्थिती मांडली आहे.


वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली विश्रांतीवर आहे आणि तो थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या दरम्यान त्याला ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांना मुकावे लागले आहे. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर विराट या फॉरमॅटमध्ये खेळलेला नाही. त्याचे २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणे अवघड आहे. तो वन डे सामने किती वर्ष खेळेल हेही निश्चित नाही. सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे महत्त्वाचे आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा ( Brian Lara) याने हाच धागा पकडला आहे. 


लारा म्हणाला,''कोहली आता किती वर्षांचा आहे? ३५, बरोबर? त्याच्या नावावर ८० शतकं आहेत, परंतु त्याला अजूनही २० शतकांची गरज आहे. सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी जर त्याने दरवर्षी ५ शतकं झळकावली, तर त्याला किमान ४ वर्ष तरी खेळावे लागेल. तेव्हा कोहली ३९ वर्षांचा असेल. हे खूप अवघड आहे, खूप खूप अवघड. कोहली अजून अनेक विक्रम मोडेल, परंतु सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडणे अवघड आहे.''


कोहली १०० शतकं करेल हे क्रिकेटच्या परिभाषेत अतार्किक आहे, असेही लाराला वाटते. तो म्हणाला, मी काय, कोणीच ठामपणे हे सांगू शकत नाही. जे म्हणत आहेत की विराट सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडेल, ते क्रिकेटींग लॉजिकचा विचारच करत नाहीत. २० शतकं, अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. अनेक क्रिकेटपटू संपूर्ण कारकीर्दित इतकी शतकं झळकावत नाहीत. वय कोणासाठी थांबत नाही.''  
 

Web Title: Virat Kohli impossible to break Sachin's record of 100 centuries; Brian Lara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.