Join us  

विराट कोहलीने एका वर्षात केली 847 कोटींची कमाई, तरीही टॉप-3 मध्ये समावेश नाही...

विराट कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 6:40 PM

Open in App

Virat Kohli Income : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. खासकरुन क्रिकेटपबद्दल बोलायचे, तर विराट सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. गेल्या 12 महिन्यांत कोहलीने जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. 

एका अहवालानुसार, विराटने 12 महिन्यांत 847 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, एवढी कमाई करुनही सर्वाधिक कमाईच्या बाबतीत तो 9व्या क्रमांकावर राहिला. या यादीत सर्वात वर पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, ज्याने गेल्या वर्षभरात तब्बल 2081 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

टॉप-10 मध्ये कोहली एकमेव क्रिकेटर स्टॅटिस्टाच्या ताज्या अहवालात गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील महान खेळाडूंनी भरलेल्या या यादीत विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर टॉप-10 मध्ये आहे. या यादीमध्ये 1 सप्टेंबर 2023 ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीतील कमाईचा समावेश आहे. यादीत बहुतांश खेळाडू फुटबॉलपटू आणि बास्केटबॉलपटू आहेत.

कोहलीच्या कमाईचे साधन?विराटकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. तो अजूनही बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या सर्वोच्च श्रेणीत समाविष्ट आहे. तिथून त्याला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय, वर्षभर कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळण्यासाठी वेगवेगळी फी मिळते आणि त्यातूनही सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रत्येक मोसमात कोहलीला 15 कोटी रुपये देते. क्रिकेट क्षेत्रातील या कमाईनंतर, त्याचे खरे उत्पन्न वेगवेगळ्या ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. कोहली MRF, Puma, Audi, HSBC, American Tourister, Philips आणि इतर डझनभर देशी-विदेशी कंपन्यांच्या जाहिराती करतो.

स्वतःच्या अनेक कंपन्याइतकंच नाही तर कोहली स्वतः डिजीट इंडिया, वन ॲट कम्युन, राँग यासह अनेक कंपन्यांचा मालक किंवा शेअरहोल्डर आहे. कोहलीने गेल्या आर्थिक वर्षात एकूण 66 कोटी रुपये आयकर भरला आहे, जो भारतातील कोणत्याही खेळाडूने भरलेला सर्वाधिक आयकर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वयाच्या 35व्या वर्षी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कोहलीच्या कमाईत आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही घट झालेली नाही. 

सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 खेळाडू

  1. क्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल)- 2081 कोटी
  2. जॉन रॉड्रिगेज (गोल्फ)- 1712 कोटी
  3. लियोनल मेसी (फुटबॉल)- 1074 कोटी
  4. लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल)- 990 कोटी
  5. कीलियन एमबाप्पे (फुटबॉल)- 881 कोटी
  6. जियानिस एंटेटोकोउनम्पो (बास्केटबॉल)- 873 कोटी
  7. नेमार जूनियर (फुटबॉल)- 864 कोटी
  8. करीम बेंजेमा (फुटबॉल)- 864 कोटी
  9. विराट कोहली (क्रिकेट)- 847 कोटी
  10. स्टीफन करी (बास्केटबॉल)- 831 कोटी
टॅग्स :विराट कोहलीइन्कम टॅक्सऑफ द फिल्डख्रिस्तियानो रोनाल्डो