virat kohli and anushka sharma । हैदराबाद : विराट कोहलीनेसनरायझर्स हैदराबादविरूद्ध स्फोटक खेळी करून यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. यजमान हैदराबादला पराभवाची धूळ चारून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. १८७ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचे सलामीवीर फाफ डूप्लेसिस आणि विराट कोहली यांनी अप्रतिम खेळी केली. किंग कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. तब्बल चार वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक ठोकल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.
शतकी खेळी आणि मोठ्या फरकाने विजय मिळाल्यानंतर किंग कोहलीने एकच जल्लोष केला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा कालचा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित नव्हती. पण बॉलिवूड अभिनेत्रीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या पतीच्या खेळीचे कौतुक केले. 'विरूष्का'ने मैदानातच व्हिडीओ कॉल केल्याचा फोटो समोर आला आहे.
अनुष्काने विराटच्या शतकाचे कौतुक करताना इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली.
IPL 2023 Play Offs Scenario : RCB सॉलिड जिंकले, मुंबई इंडियन्सला मागे टाकले; गणित अटीतटीचे बनले
आरसीबीचा मोठा विजय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. हेनरिक क्लासेनच्या (१०४) शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने आरसीबीसमोर १८७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कोहली आणि डूप्लेसिस यांनी पहिल्या बळीसाठी १७२ धावांची भागीदारी नोंदवली. विराटने (१००) तर कर्णधार डूप्लेसिसने (७१) धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर आरसीबीने ८ गडी आणि ४ चेंडू राखून मोठा विजय साकारला.