इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात विराट कोहलीला ( Virat Kohli) अपयशाकडून पाठ काही सोडवता आलेली नाही. रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार कोहली Golden Duck वर बाद झाला. जगदिशा सुचिथच्या पहिल्याच चेंडूवर विराटने शॉर्ट मिड विकेटवर उभ्या असलेल्या केन विलियम्सनच्या हाती सोपा झेल दिला. विराटचा फॉर्म हा RCBसाठीच नव्हे, तर टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. आयपीएलनंतर भारतीय संघाची आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची तयारी सुरू होणार आहे आणि विराट हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. अशात माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी त्याला आयपीएलमधून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhatar) यानेही मोठं विधान केलं आहे.
२००८ ते २०२१ या आयपीएलमध्ये विराट फक्त तीन वेळाच गोल्डन डकवर बाद झाला होता आणि २०२२मध्ये तो तीन वेळा पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. विराटने यंदाच्या पर्वात १२ सामन्यांत १९.६४च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. विराटच्या फॉर्मबद्दल Sportskeeda सोबत बोलताना शोएब अख्तरने म्हटले की, विराट हा दिग्गज खेळाडू आहे आणि त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, परंतु तो प्रचंड दडपणात आहे आणि त्याला यातून बाहेर पडण्यासाठी नवा मार्ग शोधायला हवा. तो भरपूर प्रयत्न करतोय. त्याने आता मैदानावर उतरून खेळाचा आस्वाद लुटावा... विराट कोहलीसारख्या दिग्गजाला या परिस्थितीतून कसं बाहेर यायचं हे माहित्येय, परंतु जग त्याला खाली खेचतंय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ११ सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या RCB ला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता तीनही लढती जिंकाव्या लागणार आहेत. अशात फॅफचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा ठरला. विराटच्या विकेटनंतर रजत पाटिदार व फॅफ यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी संघाला १० षटकांत १ बाद ९० धावांपर्यंत मजल मारून दिली.
Web Title: Virat Kohli is a great player but...: Shoaib Akhtar feels ex-RCB skipper finding new ways to get out in IPL 15
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.